माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या ११ व्या स्मृतिदिननिमित्त बाभळगाव, विलासबाग येथे आदरांजली कार्यक्रम
लातूर (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सोमवार दि. १४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता विलासबाग, बाभळगाव येथे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रार्थनासभेसाठी स्नेही मंडळींनी सकाळी ८.५० वाजता विलासबाग, बाभळगाव येथे उपस्थित राहावे असे विनम्र आवाहन देशमुख कुंटूबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
समाजकारण आणि जनसेवेचे साधन म्हणून राजकारण करणारे, आदरणीय विलासराव देशमुख जनसामान्यांचे नेते होते, महाराष्ट्राच्या समतोल विकासाच सूत्र हा त्यांच्या कार्यपद्धतीचा मूलमंत्र होता. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री या विविध पदावर काम करताना लातूरसह
राज्यातील आणि देशातील लोकांच्या जीवनात परीवर्तन घडवण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम केले. त्यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील शिक्षण,
सहकार, कृषी, सिंचन, उदयोग या क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांच्या उभारल्या गेल्या, त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात आर्थिक क्रांती होऊन जीवनमानात अनुलाग्र बदल झाला आहे. लातूर आणि लातूरकरावर आदरणीय विलासराव देशमुख यांचे अतोनात प्रेम होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लातूरचे हीत जोपासले. राजकीय जीवनात काम करतांना जे जे नव ते लातूरला हव ही ब्रीद कायम पाळल.
अशा या अष्टपैलू नेतृत्वाला आदरांजली वाहण्यासाठी सोमवार दि. १४ ऑगस्ट २०२३ रोजी बाभळगाव येथील विलासबाग येथे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी सकाळी ८.५० वाजता विलासबाग येथे सर्वांनी स्थानापन्न व्हावे अशी अपेक्षा आहे. सकाळी ९.०० वाजता पुणे येथील
सुप्रसिद्ध संगीतकार पंडीत रघूनाथ खंडाळकर, पंडीत सुरंजन रघूनाथ खंडाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून भावदर्पण हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यानंतर सकाळी ९.४५ वाजता शेवटचे भजन
होईल, भजन संपल्या नंतर सकाळी ९.५५ पासून पुष्पअर्पण करुन आदरांजली वाहण्यात येईल. आदरांजली वाहील्यानंतर सकाळी १०.०० वाजता प्रार्थना सभेचा समारोप होईल. या प्रार्थना सभेचे सुत्रसंचालन बाळकृष्ण धायगूडे करणार
आहेत. या आदरांजली सभेस विलासबाग, बाभळगाव येथे जनतेने आवर्जून वेळेत उपस्थित राहावे, असे विनम्र आवाहन देशमुख कुटूंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.