प्रशासकीय अधिकाऱ्यांना वटणीवर आणणारे, विरोधकांनाही जबरी शब्दात बोलणारे माजी मंत्री बच्चू कडू यांनी आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनाही इशारा दिला आहे. ऑनलाईन गेमची जाहिराती केल्याने सचिन यांच्या विरोधात त्यांनी संताप व्यक्त केला. त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. “या ऑनलाईन गेममध्ये चुकूनही त्यांचा फोटो असलेले कुठे पोस्टर वगैरे आहे की नाही हे तपासलं पाहिजे. ऑनलाईन गेमच्या जाहिरातीतून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. ही आमची विनंती आहे. तसे नाही झालं तर आम्हाला पर्यायी मार्ग शोधावा लागेल,” असे कडू म्हणाले.
“सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर parhar स्टाईल आंदोलन केले जाणार आहे. भारतरत्न असलेले सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन गेमच्या जाहिरातीबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. देशाचा ते अभिमान आहेत. म्हणून त्यांनी या जाहिरातीतून माघार घ्यावी,” असे कडू यांनी नमूद केले.
“सचिन हे भारतरत्न नसते तर आम्ही आंदोलनही केलं नसतं, या जाहिरातीतून त्यांनी माघार घ्यावी, यासाठी आम्ही त्यांना पंधरा दिवसांची मुदत देऊ त्यानंतर मात्र घरासमोरच आंदोलन करू,” असा इशाराही कडू यांनी दिल बच्चू कडू म्हणाले, “आमचं आंदोलन नेहमीच वेगळं असतं. यंदाही तसेच काहीतरी असेल. भारतीयांची ऑनलाइन गेमपासून मुक्तता व्हावी, म्हणून आम्ही त्यांना नारळपान देऊ. त्यांना नारळ देऊन त्यातून बाहेर निघण्याची विनंती करू. काही जण सुपारी घेतात, तुम्ही नारळ घ्या. जाहिरातच नाही तर ऑनलाइन गेमच हद्दपार करा,”