• Sat. Aug 9th, 2025

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विविध संस्था पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या घेतल्या भेटी

Byjantaadmin

Aug 11, 2023

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विविध संस्था पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या घेतल्या भेटी
निवेदनाचा स्वीकार करून संबंधितांना केल्या आवश्यक सूचना

लातूर (प्रतिनिधी) ११ ऑगस्ट २०२३: राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज
शुक्रवार दि.११ ऑगस्ट रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकाऱ्यांसह, नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या त्यांच्या निवेदनांचा व आमंत्रणाचा स्वीकार करून संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या. यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, विलास, को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हा.चेअरमन समद पटेल, टवेन्टिवन शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन रवींद्र काळे, बाबासाहेब गायकवाड, ओमप्रकाश
झुरळे, हनमंत पवार, मुकेश राजमाने, लातूर बाजार समितीचे उपसभापती सुनील पडीले, माजी नगरसेवक रविशंकर जाधव, आयुब मणियार, व्यंकटेश पुरी, गौस गोलंदाज, मधुकर काळदाते, किशोर कांबळे, राजा माने, मस्जिद बागवान, हनुमंत पवार, गणेश एस.आर.देशमुख, मुकेश राजमाने, संतोष बिराजदार, अभिषेक पतंगे, शरद हंचाटे, विजय वर्मा, सुनील कंकाळ, उमेश ब्रिजवासी, अर्जुन महिंद्रकर, हर्षवर्धन सवई, रोहित दयाळ, पप्पू देशमुख, रामदास पवार, महेश काळे, बिबीशन सांगवीकर, मुकेश राजमाने, निलेश राजमाने, बाबुराव जाधव, शिवाजी कांबळे, विकास कांबळे, रमेश सूर्यवंशी, सचिन मस्के, उपसरपंच गोविंद देशमुख, ग्रामविकास अधिकारी आनंद मडके, गोपाळ थडकर, मोहन सुरवसे, आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध अधिकारी, कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

बाभळगाव ग्रामपंचायतीच्या  दोन घंटागाडीचे लोकार्पण

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते बाभळगाव ग्रामपंचायतीच्या जनसुविधा जिल्हा वार्षिक योजनेतून खरेदी करण्यात आलेल्या दोन घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अँड किरण जाधव, रवींद्र काळे, ओमप्रकाश पडिले, समद पटेल, सचिन बंडापल्ले, सरपंच प्रिया मस्के, उपसरपंच गोविंद देशमुख, अय्युब मणियार, विकास कांबळे, राजेसाहेब सवाई, रविशंकर जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *