• Sat. Aug 9th, 2025

…आता भाजपकडून 15 ऑगस्टला तिरंग्यासोबत भगवा भडकवण्याचे फर्मान!

Byjantaadmin

Aug 11, 2023

आंबे खाण्यापासून ते टिकली लावण्यापर्यंत ते पार महापुरुषांच्या कर्तृत्वाचा अपमान करण्यापर्यंत गेल्या काही दिवसांपासून बेताल वक्तव्यांची मालिकाच लावलेल्या संभाजी भिडे यांच्याकडून 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी भगवा फडकवण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. आता याच सुरामध्ये भाजपकडून भाजपनेही सूर मिसळला आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी कोल्हापुरात बोलताना 15 ऑगस्टला तिरंगा शेजारी भगवा ध्वज प्रत्येकाने लावावा, असे आवाहन केले आहे. त्यामुळे भिडेंनंतर भाजपकडूनही भगवा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

kolhapur news First Sambhaji Bhide and now the order from BJP to instigate saffron with tricolor on August 15 Kolhapur News: आधी संभाजी भिडे आणि आता भाजपकडून 15 ऑगस्टला तिरंग्यासोबत भगवा भडकवण्याचे फर्मान!

 

पावसकर म्हणाले की, तिरंग्याला जेवढा मान तेवढाच भगव्याला मान आहे. येणाऱ्या काळात तिरंग्या बरोबर भगवा फडकवला तरी हरकत नाही. पूर्वजांपासून भगवा ध्वज चालत आला आहे. राष्ट्रध्वज हा तिरंगा आहे, सोबत भगवा ध्वज फडकवा. शाळेमध्ये हिंदूनी टिकली लावली, दोरा बांधला तर अडवणूक होत आहे.  इतर धर्माची मात्र अडवणूक केली जात नाही.

लोकसभेसाठी जोमाने कामाला लागा

दरम्यान, आज (11 ऑगस्ट) लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत भाजपची कोल्हापूर, हातकणंगले विभागाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. लोकसभा प्रवास योजना प्रमुख माजी मंत्री बाळा भेगडे यांनी लोकसभा कोअर टीम व विधानसभा प्रमुखांना मार्गदर्शन केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशा सूचना केल्या. प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी कोल्हापूर ग्रामीण मंडल अध्यक्ष निवडीसंदर्भात तालुका निहाय पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन प्रत्येकाचे मत जाणून घेतले.

आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये नवमतदार नोंदणी, वॉर रूम, निवडणूक विश्लेषण, आगामी काळात विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांचे पक्ष प्रवेश यांच्यासह मोदी @9 कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसभेमध्ये झालेले घर घर संपर्क अभियान, व्यापारी संमेलन, प्रभावी व्यक्तींच्या भेटी, घर घर तिरंगा, मन की बात, मेरी माटी, मेरा देश, विभाजन विभीषिका, तिरंगा रेली, अशा सर्व गोष्टींचा अंतर्भाव बैठकीत घेण्यात आला. आगामी निवडणूक कोणासोबत लढवली जाईल याचा निर्णय प्रदेश स्तरावर प्रमुख नेतेमंडळी घेतील ,परंतु पक्ष संघटना जास्तीत जास्त मजबूत करून पक्षकार्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवणे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले kolhapur  व हातकणंगले लोकसभेतील विधानसभा प्रमुखांनी आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये झालेल्या संघटनात्मक कामांची माहिती यावेळी सांगितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *