निलंगा येथे छत्रपती शिवाजी महाराज व माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले विनम्र अभिवादन
निलंगा: राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण संस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज शुक्रवार दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाऊन रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कर्मयोगी स्व.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, महाराष्ट्र शिक्षण समिती निलंगाचे सचिव विजयकुमार पाटील निलंगेकर, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, ट्वेंटीवन शुगरचे व्हा.चेअरमन विजय देशमुख, निलंगा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, लातूर जिल्हा काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ अरविंद भातांब्रे, शिरूर अनंतपाळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब पाटील, देवणी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजित बेळकोने, निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, महेश देशमुख, पंकज शेळके, बाबासाहेब गायकवाड, संभाजी रेड्डी, आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते