लोकनेते विलासराव देशमुख यांच्या नावाला साजेल असे कार्य आगामी काळात देखील करत राहू
मांजरा कारखाना सर्वसाधारण सभेत सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांचे प्रतिपादन
विलासनगर लातूर :-विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना आपल्या पारदर्शक कारभारातून सक्षमपणे मागील ३८ वर्षापासून यशस्वी वाटचाल करत आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या नावाला साजेल असे काम आजपर्यंत करत आलो आहोत व यापुढे देखील हे काम त्याच निष्ठेने करत राहू असे प्रतिपादन मांजरा कारखान्याचे चेअरमन तथा मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी केले आहे
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २०२१-२०२२ अधिमंडळाची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री तथा कारखान्याचे संचालक राज्याचे माजी मंत्री आमदार अमितभैया देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार तथा लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव २१शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, विलास कारखान्याचे व्हा.चेअरमन रविंद्र काळे,रेणाचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, संत शिरोमणी कारखान्याचे व्हा.चेअरमन शाम भोसले, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख, विलास कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई, विलास २ चे श्री पवार, रेणाचे कार्यकारी संचालक बी.व्ही. मोरे, जागतीचे प्रकल्प व्यवस्थापक गणेश येवले, २१शुगरचे समीर सलगर, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक एच. जे. जाधव, संत शिरोमणीचे प्र.कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मांजरा कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर
मांजरा साखर कारखाना सभासदांसाठी कटिबध्द
माजी मंत्री दिलीपराव देशमुख
यावेळी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख पुढे बोलताना ते म्हणाले की शेतकरी सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी मांजरा परिवार कटीबद्ध असून भविष्यात मांजरा कारखान्याची गाळप क्षमता वाढवून शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर कारखान्याकडे यावा यासाठी नियोजन केले जाणार आहे. तसेच येणारा काळ हा स्पर्धेचा असून नवीन बदलांचा स्वीकार करून इथेनॉल निर्मिती सर्वाधिक क्षमतेने करून त्या माध्यमातून अधिकचा दर देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मांजरा कारखाना सभासदांना दीपावली निमित्त प्रति सभासद 50 किलो साखर प्रति किलो रु. 25/- प्रमाणे सवलतीच्या दरात देणार आहे. तसेच मांजरा कारखाना कर्मचाऱ्यांना दहा टक्के बोनस देणार असल्याचे त्यांनी जाहीर करुन शेतकरी सभासदाचे ठेवीवरील व्याजाची संपुर्ण देय रक्कम दिवाळीपुर्वी अदा करणार व पुढील वर्षापासून मुद्दलाचा पहिला हप्ता व व्याज अदा करणार असल्यांचे त्यांनी सांगितले.
राज्यात अग्रगण्य असणारा मांजरा साखर कारखाना
माजी मंत्री आमदार अमित देशमुख
वार्षिक सर्वसाधारण सभेत यावेळी आपल्या भाषणात माजी मंत्री आ.श्री. अमित विलासरावजी देशमुख म्हणाले की, मांजरा परिवाराने आपल्या कार्यातून शेतकऱ्यांचा विश्वास कमावला आहे. मांजरा परिवारातील साखर कारखान्यामध्ये सकारात्मक स्पर्धा असून मांजरा कारखान्यांने नेहमी चांगले काम केले आहे. तो विश्वास कायम ठेवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. आपल्या हिताचे कोण काम करतो हे सर्वांनी ओळखले पाहीजे व चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी भविष्यात देखील खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. .मांजरा परिवाराची वाटचाल ही सहज नसुन यामागे अथक परिश्रम, प्रामाणिकपणा, पारदर्शी कारभार याचा मोलाचा वाटा असल्याचे सांगुन राज्यात अग्रगण्य असणारा मांजरा साखर कारखाना नावारूपाला येईल असे सांगून देशपातळीवर सहकार नेतृत्व पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मुळे मांजरा साखर कारखान्याचे नाव देशात गेले आहेत त्यांचा आपल्याला अभिमान आहे कुटुंब प्रमुख म्हणून माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मुळे मांजरा साखर परिवारातील साखर कारखाने चांगले कार्य करीत असून त्याचे सर्व श्रेय काकांना जाते आपल हे सौभाग्य आहे अशा शब्दात माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अमीत देशमुख साहेब यांनी कौतुक केले
जिल्हा बँकेकडून हार्वेस्टर साठी कर्ज पुरवठा केला मांजरा परिवाराने आर्थिक क्रांती घडवून देशात नावलौकिक मिळवला-आमदार धीरज देशमुख यांचे प्रतिपादन
यावेळी बोलताना आमदार धिरज विलासराव देशमुख म्हणाले की, मांजरा साखर कारखान्याने पहिल्या गळीत हंगामात दीड लाख मेट्रिक टनाचे गाळप केले होते व नुकतेच संपलेल्या गळीत हंगामात मांजरा परिवाराने ५७ लाख मेट्रिक टनाचे गाळप केलेले आहे. हे पाहून सर्वांना अभिमान वाटावा असे कार्य करुन लोकनेते विलासराव देशमुख यांनी घालून दिलेल्या आदर्शावर व सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या सक्षम अशा नियोजनात मांजरा परिवार शेतकरी सभासदांच्या जिवनात आर्थिक क्रांती घडवण्याचे काम करुन देशात नाव लौकीक मिळवला असल्याचे सांगुण लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने साखर कारखान्यास वेळोवेळी आवश्यक तो कर्जपुरवठा करून शेतक-या प्रती कर्तव्य पार पाडले आहे. विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यातील भुमीपुत्रांच्या हाताला काम मिळावे व त्यांना व्यवसायाची संधी मिळावी यासाठी ऊस तोड यंत्रासाठी सुलभतेने कर्जपुरवठा करून बांधीलकी जोपासली आहे असे ते म्हणाले.
यावेळी प्रास्ताविकपर मनोगत व्हा. चेअरमन, श्री. श्रीशैल उटगे यांनी करुण कारखान्याच्या वाटचालीचा सविस्तर अहवाल त्यांनी यावेळी सादर करून मान्यवर नेत्यांच्या सक्षम अशा मार्गदर्शनात मांजरा कारखान्याची गरूड झेप यापुढे देखील कायम राहील असे सांगितले. या सर्व साधारण सभेतील सर्व विषयांचे वाचन कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी केले तर उपस्थित सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात सर्व विषयांना मंजुरी दिली. यावेळी रेणाचे माजी चेअरमन यशवंत पाटील, माजी आमदार वैजनाथ शिंदे,साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील यांची समयोचित भाषणे झाली.
यावेळी कारखान्याचे संचालक अशोकराव काळे, तात्यासाहेब देशमुख, कैलास पाटील, सदाशिव कदम, बंकटराव कदम, वसंतराव ऊफाडे, ज्ञानेश्वर पवार, निळकंठ बचाटे (पवार), सचिन शिंदे,सुर्यकांत पाटील, धनराज दाताळ, नवनाथ काळे,अनिल दरकसे, शेरखाँ पठाण, शंकरराव बोळंगे, बाबुराव जाधव,तज्ञ संचालक महेंद्रनाथ भादेकर, ज्ञानेश्वर भिसे, विशाल पाटील, सौ.निर्मला चामले,श्रीमती मंगलाबाई पाटील,कार्यलक्षी संचालक श्रीनिवास देशमुख, यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार कैलास पाटील यांनी मानले सुत्रसंचलन सचिन सूर्यवंशी यांनी केले