औराद शहाजनी पोलीस ठाणेच्या हद्दीतून लाखोंच्या गुटख्याची महाराष्ट्रात इन्ट्री
औराद येथे गुटखा माफीयांचे मोठे जाळे
निलंगा ( प्रतिनिधी ) तालुक्यातील औराद शहाजानी पोलीस ठाणे हद्दीतून महाराष्ट्रत बंदी असलेल्या लाखो रुपयांच्या गुटख्याची कर्नाटकातून राजरोसपणे आवक केली जाते . गुटख्याने भरलेली वाहने महाराष्ट्रात प्रवेश करत असताना पोलीस प्रशासन अर्थपूर्ण व्यवहारातून डोळे झाक करत असल्याने खुलेआम अवैध गुटख्याची महाराष्ट्रात तस्करी केली जाते . औराद शहाजानी शहराला जोडणाऱ्या लातूर जहीराबाद राष्ट्रीय महामार्गासह पाच गावांच्या अंतरराज्य रस्त्याद्वारे वाहनाने गुटख्याची आवक केली जाते . शिवाय निलंग्यासह औराद येथे गुटखा माफियांचे मोठे जाळे पसरले असून चार मुख्य गुटखा माफिया मार्फत अनेक सप्लायरच्या सहाय्याने प्रशासनाच्या कृपाशीर्वादाने बिनधास्तपणे गुटख्याची विक्री केली जाते . यात अनेक तरुण वेसनाधीन बनत असल्याने अवैध गुटखा विक्रीवर जिल्हा प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे .
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी हे तेरणा व मांजरा काठावर वसलेले कर्नाटकाशी विविध सहा रस्त्याने जोडले गेलेले शहर आहे . हे शहर कर्नाटकाशी लातूर जहीराबाद राष्ट्रीय महामार्गासह औराद शहाजानी ते तांबाळा राज्य मार्ग , औराद ते कर्नाटकातील कोटमाळ , तुगाव , हणमंतवाडी , वांजरखेडा या सहा मार्गाशी संलग्न आहे . ही वाहातुकीची महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारी रस्ते आहेत . या सर्व मार्गाने निलंगा येथील दोन व औराद येथील दोन अशा चार मुख्य गुटखा माफियामार्फत बिनधास्तपणे महाराष्ट्रात राज्य शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची आवक केली जाते .सदर गुटखा बंदी व कार्यवाई ही अन्न व औषधी प्रशासनाचा विषय असला तरी स्थानिक पोलीस प्रशासन मात्र हम करेसो कायदा म्हणत अर्थपूर्ण व्यवहारातून डोळे झाक करत त्यांना अभय देत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळते . महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची राजरोसपणे ट्रक , टेम्पो ,जीप , टमटम , ओमिनी कार आदी अनेक वाहनांनी गुटख्याची कर्नाटकातून महाराष्ट्रात तस्करी केली जाते . अवैधरित्या महाराष्ट्रात आवक झालेल्या गुटक्याची अनेक सप्लायर मार्फत लातूर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यात व तालुक्यात पुरवठा करणारे मोठे रॅकेट असल्याने छोटे दुकानदार , पान स्टॉल , हॉटेल ,किराणा दुकान आदी ठिकाणी खुलेआम अवैद्यरीत्या गुटख्याची विक्री केली जाते . यात शाळकरी मुले व तरुण व्यसनाधीन बनत असल्याने प्रशासनाविषयी नागरिकांतून संताप व्यक्त करीत या गुटका तस्करावर वरिष्ठ प्रशासन यावर कारवाईचा बडगा उगारणार का ? असा प्रश्न उपस्थित करीत जिल्हा प्रशासनाने तात्काळ अवैद्यरित्या गुटखा विक्री करणाऱ्या गुटखा माफीयावर कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे .
औराद शाहाजनी पोलीस ठाणेच्या हद्दीतून लाखोंच्या गुटख्याची महाराष्ट्रात इन्ट्री
