शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने निलंगा येथे अतिशबाजी व जल्लोष
निलंगा (प्रतिनिधी)शिवसेनेचे फायर ब्रँड नेते बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे झुकेंगे नही म्हणणारे संजय राऊत यांना तब्बल 100 दिवसाच्या तपासानंतर मिळालेल्या जामीनामुळे निलंगावत शिवसेना व महाविकास आघाडीच्या वतीने मोठी अतिशबाजी करीत जल्लोष साजरा करण्यात आला.
शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची खंबीर साथ देणारे 50 खोके एकदम ओके म्हणत 40 आमदार व बारा खासदारांनी साथ सोडल्यानंतर त्यांचा खरपूस समाचार घेण्यासाठी कुठेही तसूवर सुद्धा कमी न पडलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत खंबीर उभा असणाऱ्या संजय राऊत यांच्यावर पत्राचाळीच्या कथेत घोटाळा प्रकरणी आरोप करून त्यांना अडकवण्यासाठी ताब्यात घेण्यात आले परंतु शिवसेनेचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळख असणाऱ्या संजय राऊत यांनी तुटेंगे लेकिन झुकेगे नही मनात आपल्या भूमिकेवर ठाम राहिले म्हणून त्यांना तब्बल 100 दिवस तपासाच्या नावाखाली ताब्यात ठेवण्यात आले परंतु आज न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला यामुळे निलंगा शिवसेनेच्या वतीने आज निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठी अतिशबाजी करीत जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी शिवसेनेचे विनोद आर्य, हरीभाऊ सगरे, ईश्वर पाटील, दयानंद चोपणे, दत्ता मोहळकर, प्रशांत वांजरवाडे, शिवाजी पांढरे, गोपाळ हिबारे, मुस्तफा शेख, रेखाताई पुजारी, गोविंद सूर्यवंशी, दैवता सगर, सविताताई पांढरे, अरुणा माने, अमोल सोनकांबळे, जगदिश लोभे, सतीश धडे, राहुल बिराजदार, रब्बानी सौदागर, अजय कांबळे, सुग्रीव सुर्यवंशी, अंगद जाधव, सतीश फट्टे, यशवंत पवार, पृथ्वीराज निंबाळकर, आधी सह शिवसैनिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.