महाराष्ट्र महाविद्यालयात १५ दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
निलंगाः येथील महाराष्ट्र महाविद्यालयातील वाणिज्य विभाग, सॅाफ्ट स्किल अॅंड आंत्रप्रिनरशिप डेवलेपमेंट सेल तसेच करीअर मार्गदर्शन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने व ग्लोबल टॅलेंट ट्रॅक, पुणे यांच्या साहचर्यातून १५ दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. माधव कोलपूके हे होते तर उद्घाटक आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून मिर्झा अर्शद बेग हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॅा. नरेश पिनमकर यांनी केले. बेग यांनी बदलत्या बाजारपेठेतील बदलत्या करीअर संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच नोकरीच्या संधी प्राप्त करताना कोणकोणत्या कौशल्यांची आवश्यकता आहे याचेही सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी सॅाफ्ट स्किल अॅंड आंत्रप्रिनरशिप डेवलेपमेंट सेलचे समन्वयक डॅा. मिलिंद चौधरी यांनी महाविद्यालयात चालणाऱ्या कौशल्याभिमुख कोर्सेसबद्दल विद्यार्थ्यांना अवगत केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॅा. कोलपूके यांनी नवीन शैक्षणिक धोरण-२०२० च्या अनुशंगाने अशा प्रशिक्षण शिबिरांची आवश्यकता आणि उपयोगितेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन प्रा. संदिप सुर्यवंशी यांनी केले तर आभार डॅा. गोविंद शिवशेट्टे यांनी मानले. डॅा. ज्ञानेश्वर चौधरी तथा प्रो. डॅा. सुर्यकांत वाकळे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. शिल्पा कांबळे, प्रा. अक्षय पानकुरे, प्रा. वैभव सुर्यवंशी, प्रा. गिरीष पाटील, प्रा. मनीषा घोगरे यांनी प्रयत्न केले. या प्रशिक्षण शिबीरासाठी महाविद्यालयातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यशस्वी प्रशिक्षणार्थिंना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.