मांजरेश्वर हनुमान मंदिरात धोंडे जेवनाचा कार्यक्रम संपन्न
जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील मान्यवर माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची उपस्थिती
लालासाहेब देशमुख प्रा.प्रकाश देशमुख विकास देशमुख परिवाराने घेतला पुढाकार
लातूर:-अधिक मास अर्थात धोंडे जेवण देण्याची परंपरा आहे विशेषतः आपल्या कुटुंबातील मुलगी, जावई ,आप्ते नातेवाईक यांना गोड धोड करून त्यांना आहेर करायची रीत आहे असाच एक आगळा वेगळा कार्यक्रम मंगळवारी
अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प लालासाहेब देशमुख महाराज,प्रा.प्रकाश देशमुख , मांजरेश्वर हनुमान मंदिराचे कोषाध्यक्ष विकास देशमुख कुटुंबियांच्या वतीने मांजरेश्वर हनुमान मंदिर ,लातूर येथे धोंडे जेवणाचा कार्यक्रम शेतकर्यांचे सहकारातील विठ्ठल माजी मंत्री तथा मांजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष आदरणिय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत व सर्व वारकर्यांच्या साक्षीने धोंडे जेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला
यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरुवर्य प्रकाश बोधले महाराज यांचे उत्तराधिकारी परमेश्वर बोधले महाराज,प्रदेश सदस्य हभप गणपत बाजुळगे महाराज,लातूर जिल्हा अखिल भारतीय वारकरी मंडळाचे उपाध्यक्ष हभप दिलीप वलसे महाराज,मुख्यसचिव हभप गोविंदराव दोडके ,प्रसिध्दी प्रमुख राजकुमार सोमवंशी,कार्यालयीन प्रमुख मुरलीधर गायकवाड (माळी),जिल्हा कार्यकारणी सदस्य मधुकर ईप्पर महाराज,अहमदपूर तालुकाध्यक्ष शिवाजी येरमुळे ,रेणापूर तालुकाध्यक्ष रामायनाचार्य उत्तम जाधव पळशीकर, चाकुर तालुकाध्यक्ष बबन आष्टेकर,निलंगा तालुकाध्यक्ष हभप गोविंद महाराज, औसा तालुकाध्यक्ष हभप खंडू माळी महाराज,जळकोट तालुकाध्यक्ष अरविंद शास्त्री महाराज, औसा सतीश जाधव बनसारोळा जि.बीडचे बुवासाहेब देशमुख चापोलीचे राजेंद्र कोल्हे गुरुजी, लातूररोड चे पंढरीनाथ मुंढे, ढाळेगावचे गंगाधर चौकटे, गोंदेगावचे रामचंद्र देशमुख यांच्यासह वारकरी मंडळाचे पदाधिकारी व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते ..