साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी वंचीत समाजाला न्याय देण्याचे कार्य केले-माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन
लातूर (प्रतिनिधी):-साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लिखाणात वंचीत समाजाला वाचा फोडण्याचे काम केले असून त्यांनी साहित्यीक ,लेखक समाज शिक्षक आदि क्षेत्रांत केलेले कार्य समाजाला दिशादर्शक आहेत असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले
ते लातूर येथील सार्वजनिक
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने समितीच्या वतीने आयोजित लातूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुर्णाकृती पुतळ्यास मंगळवारी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते
अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या
यावेळी बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे अशी मागणी त्यांनी खासदार सुधाकर शृंगारे यांच्याकडे केली त्यासाठि लातूरचे खासदार यांनी पंतप्रधान यांच्याकडे पाठपुरावा करावा पत्र लिहावे अशी अपेक्षा व्यक्त केली
यावेळी व्यासपीठावर खासदार सुधाकर शृंगारे, कोंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे,जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संदेश शिंदे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने, अँड अण्णाराव पाटील, कोंग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष अँड किरण जाधव, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजूलगे,बसवंत उबाळे, प्रा. शिवाजी जवळगेकर, अशोक देडे, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, प्रा. माधव गादेकर सुनिल बसपुरे,आनंद वैरागे, अंगद वाघमारे, लहुजी सेनेचे अध्यक्ष अमोल देडे, सुरेश चव्हाण,अप्पासाहेब देडे, नागनाथ डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते