आ. अभिमन्यू पवार यांच्याकडून अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली
औसा – साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले नगर, औसा येथे आयोजित जयंती महोत्सव व ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहून आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून विनम्र आदरांजली वाहिली.यावेळी डीवायएसपी रामदास इंगवले, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, गटनेते सुनील उटगे, शिवसेना जिल्हा संघटक जयश्री उटगे, भाजप शहराध्यक्ष लहू कांबळे, युवा काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष हणमंत राचट्टे, काँग्रेस शहराध्यक्ष शकील शेख, सामाजिक कार्यकर्ते सदानंदप्पा शेटे, कल्पना डांगे, मा. नगरसेवक अंगद कांबळे, मंजुषा हजारे, बाजार समिती संचालक विकास नरहरे, इम्रान सय्यद, शिवकुमार मुर्गे, नितीन शिंदे, सोमेश्वर वागदरे, आबा बनसोडे, दत्ता पुंड, संयोजक अविनाश पुंड, संदीप कसबे, बाली पुंड, विशाल कांबळे, श्रेयस कसबे, रुपेश कारंजे, बालाजी शिंदे व नागरिक उपस्थित होते.