महापुरुषांचा अवमान करणाऱ्या देशद्रोही मनोहर कुलकर्णी याचा निलंगा येथे पुतळा दहन करून जाहीर निषेध नोंदविला
मनोहर वेळेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- प्रमोद कदम
निलंगा तालुका महाविकास आघाडी घटक पक्ष व सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे विकृत बुद्धी व मानसिकता असलेल्या देशद्रोही मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे याच्या पुतळ्यास चप्पल मारुन दहन करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले अमर रहे, महात्मा गांधी अमर रहे, मनोहर कुलकर्णी मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या व निषेध नोंदविला.
महापुरुषांच्या बाबतीत अवमानकारक शब्द बोलने समाजाच्या भावना दुखावणे फुट पाडणे द्वेष पसरवणे राष्ट्रविरोधी वक्तव्ये करून शांतता भंग करणे याबाबत त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवून कडक कारवाई करावी व तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली तसे निवेदन उपविभागीय कार्यालय निलंगा पोलीस स्टेशन, निलंगा यांना देण्यात आले.यावेळी विजयकुमार पाटील ता. अध्यक्ष कांग्रेस पक्ष, अजीत माने माजी पं. स., सभापती हमीद शेख मा. नगराध्यक्ष, शिवसेनेचे विनोद आर्य जिल्हा प्रमुख (स.), हरीभाऊ सगरे जिल्हा उपप्रमुख, अविनाश रेशमे ता. प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष इस्माईल लदाफ, ओबीसी नेते व अशोक पाटील मित्र मंडळ चे जिल्हाध्यक्ष दयानंद चोपणे, संभाजी ब्रिगेड चे प्रमोद कदम, रिपाई आठवले गटाचे अंकुश ढेरे सामाजिक नेते रजनीकांत कांबळे, संगायो सदस्य व लहुजी शक्ती सेनेचे नेते गोविंद सुर्यवंशी, अजय कांबळे., गणराज्य चे रामलिंग पटसाळगे, भिम शक्ति चे दिगंबर सुर्यवंशी राष्ट्रवादी युवक चे धम्मानंद काळे, गंगाबाई कांबळे , व समाजातील ईतर मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.