• Tue. Apr 29th, 2025

रोटरी क्लब लातूर सेंट्रल पदग्रहण समारंभ रोटरीच्या सेवाकार्यास अध्यात्माचीसाथ – ह.भ.प. गुरुबाबा औसेकर

Byjantaadmin

Aug 1, 2023

रोटरी क्लब लातूर सेंट्रल पदग्रहण समारंभ रोटरीच्या सेवाकार्यास अध्यात्माचीसाथ – ह.भ.प. गुरुबाबा औसेकर
लातूर ः आपण करत असलेल्या सेवेला जर अध्यात्माची जोड असेल तर ते कार्य अधिक मोलाचे असते. अशाच प्रकारचे कार्य समाजात रोटरी सदस्यांकडून केले जाते, हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन नाथ संस्थानचे पीठाधीपती ह.भ.प. गुरुबाबा महाराज औसेकर यांनी केले.
रोटरी क्लब लातूर सेंट्रलच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते. यावेळी औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार व माजी प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या उपस्थितीत नूतन अध्यक्ष पुरुषोत्तम नोगजा व सचिव ऍड. नागेश स्वामी यांनी पदभार स्विकारला. आ. पवार यांनी आपल्या भाषणात, रोटरीचे कार्य हे प्रशंसा करण्यासारखे व इतरांना प्रेरणा देणारे असून कोणतेही कार्य प्रामाणिकपणे करणे हीसुद्धा एक देशसेवाच असल्याचे सांगून रोटरीचे अध्यक्ष नोगजा व सचिव स्वामी यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
आपल्या कार्यकाळात रोटरीची मूल्ये जपत सेवाभावी कार्य करण्याचे सांगत समाजाची गरज ओळखून क्लबच्या माध्यमातून प्रकल्प राबवणार असल्याचे माहिती नोगजा यांनी भाषणात दिली.
यावेळी समाजातील उल्लेखनिय कार्य करणारे केशव बालाजी मंदिर, औसाचे राजकुमार पल्लोड, प्रेमकिशन मुंदडा, आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त सुलोचना नोगजा, अन्नसेवेच्या कार्याबद्दल गोविंदलाल पारीख, रोटरीच्या देणगीबद्दल विनय जाजू, नंदकिशोर लोया, विष्णू सारडा यांचा रोटरीच्यावतीने सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात रोट्रॅक्ट क्लबचा पदग्रहण सोहळा पार पडला. नूतन अध्यक्ष शैलेश गुंडरे, सचिव गणेश अग्रोया यांनी पदभार स्विकारला. माजी प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांनी रोटरीच्या कार्याची माहिती दिली. माजी अध्यक्ष हेमंत रामढवे यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या उपक्रमाची माहिती सांगून सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.
रोट्रॅक्ट अध्यक्ष वैभव बेल्लाळे, सचिव सोमेश कान्नव यांनी आपल्या कार्यकाळात राबवलेल्या प्रकल्पाची माहिती दिली. या प्रसंगी प्रांतपाल स्वाती हेरकल, माजी प्रांतपाल डॉ. विजय राठी, डॉ. गोपीकिशन भराडीया, रेखा धूत, लक्ष्मीकांत करवा, राजश्री करवा, शशीकांत मोरलावार, राधेश्याम धूत, अर्चना नोगजा, जीवन विमाचे रमेश चौगुले, शुभम नोगजा, अरुण पानझाडे, नामदेव कदम यांच्यासह शहरातील सर्व क्लबचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात प्रा. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागतगीताने झाली. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत सोनी यांनी केले तर आभार ऍड. नागेश स्वामी यांनी मानले. व्यासपीठावर रोट्रॅक्टचे डी. आर. आर., जालनाचे रवी भक्कड, हेमंत रामढवे, श्रीधर बाळासाहेब खैरे, सहाय्यक प्रांतपाल शशीकांत मोरलावार, अर्चना नोगजा, उषा स्वामी यांच्यासह रोटरी क्लब लातूर सेंट्रलचे २०२३-२०२४ चे सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि क्लब सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed