निलंगा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती उत्साहात साजरी
निलंगा- सर्वधर्मीय जयंती उत्सव समिती, महाविकास आघाडी, समविचारी पक्ष व संघटना, लहुजी शक्ती सेनेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे अभिवादन व फुले वाहून साजरी करण्यात आली. यावेळी अनेकांनी अण्णाभाऊ साठे यांनी बिकट परिस्थिती मध्ये दिड दिवस शाळेत शिकुन एवढे मोठे साहित्य निर्माण केले. संघर्षमय जिवनातुन लिखाणाचे व समाज प्रबोधनाचे खुप मोठे कार्य केले. त्यांचे साहित्य समाजासाठी खजिना आहे. व त्यांचे साहित्य वाचुन आपल्या दैनंदिन जीवनात आचरण केल्यास खरी जयंती साजरी केल्यासारखं होईल. असे सर्वच वक्त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जिवन चरीत्रावर प्रकाश टाकला.
यावेळी विजयकुमार पाटील ता. अध्यक्ष कांग्रेस पक्ष, अजीत माने माजी पं. स., सभापती हमीद शेख मा. नगराध्यक्ष, दयानंद चोपणे सर्वधर्मीय जयंती समितीचे प्रमुख , शिवसेनेचे विनोद आर्य जिल्हा प्रमुख (स.), हरीभाऊ सगरे जिल्हा उपप्रमुख, अविनाश रेशमे ता. प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष इस्माईल लदाफ, संभाजी ब्रिगेड चे प्रमोद कदम, रिपाई आठवले गटाचे अंकुश ढेरे सामाजिक नेते रजनीकांत कांबळे, अमोल सोनकांबळे युवक अध्यक्ष वि.,संगायो सदस्य व लहुजी शक्ती सेनेचे नेते गोविंद सुर्यवंशी, अजय कांबळे., रामलिंग पटसाळगे,जेष्ठ पत्रकार मोहन क्षीरसागर , धममानंद काळे, गंगाबाई कांबळे , व समाजातील ईतर मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.