साहित्यरत्न लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त लातूर शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जयंती उत्सवामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे यासाठी सहकार महर्षी लातूर जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांनी प्रयत्न करावा व खासदार सुधाकर शृंगारे यांनी लोकसभेत आवाज उठवत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना लवकरात लवकर भारतरत्न या महान किताबाने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी खासदार शृंगारे म्हणाले की निश्चितच येणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी मांडलेला मुद्दा नक्कीच लोकसभेत मांडणार आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले.
तसेच माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख म्हणाले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे उपकार व ऋण आपण आयुष्यात कधीही फेडू शकणार नाही. नक्कीच जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी मांडलेला मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आहे मी स्वतः महाराष्ट्रातील सर्व नेत्यांशी चर्चा करून नक्कीच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न करीन तसेच अण्णाभाऊ साठे चौकातील मोकळी जागा वाचनालयासाठी देण्याची समाजाची मागणी जी आहे ती मागणी पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन असे उद्गार काढले या प्रसंगी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, आबासाहेब पाटील सेलूकर ,श्रीपतराव काकडे ,अण्णाराव पाटील ,पृथ्वीराज शिरसाट चंद्रकांत चिकटे ,बाबासाहेब गायकवाड ,केशर ताई महापुरे , शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विष्णू साबळे साहेब, सी. के. मुरळीकर साहेब , एस. आर. चव्हाण साहेब , शहर प्रमुख सुनील बसपुरे साहेब ,तालुका प्रमुख बाबुराव शेळके साहेब , माजी शहर प्रमुख शंकर रांजणकर , फेरीवाला सेना हनुमंत पडवळ , माधव कलमुकले , भास्कर माने , राजूभाऊ कतारे, रघु बनसोडे, बाळू दंडीमे,सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संदेश अण्णा शिंदे ,अशोकराव देडे , विकास कांबळे ,आनंद भाई वैरागे ,रघुनाथ कुचेकर ,नगरसेवक कैलास कांबळे ,नगरसेवक गोरोबा लोखंडे ,अनिल शिंदे ,सुरेश चव्हाण ,जी ए गायकवाड ,जय मल्हार भैया हे सर्व उपस्थित होते.