महाराष्ट्र महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अभिवादन कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपूके यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, तर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विठ्ठल सांडूर, महाविद्यालयातील स्टाफ सचिव डॉ. भगवान वाघमारे महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री उमाजी तोरकड यांनी विशेष परीश्रम घेतले.