अनसरवाडा येथे सोयाबीन शेती शाळा च्या दुसरा वर्ग संपन्न
निलंगा(प्रतिनिधी):- तालुक्यातील अनसरवाडा येथे अनसरवाडा ऑरगॅनिक फार्मर प्रोडूसर कंपनी अंतर्गत सोयाबीन शेती शाळेच्या दुसऱ्या वर्गाचे आयोजन केले होते सदर शेती शाळेसाठी मंडळ कृषी अधिकारी रणजीत राठोड आत्मा चे करमचंद राठोड तुकाराम सुगावे शेती शाळेसाठी मार्गदर्शक म्हणून विनोद नाईकनवरे ट्रॉपिकल ऍग्रो केमिकल लिमिटेड चे प्रतिनिधी आणि कंपनीचे चेअरमन विवेकानंद वाडीकर उपस्थित होते.
शेती शाळेच्या दुसऱ्या वर्गामध्ये मंडळ कृषी अधिकारी रणजीत राठोड यांनी शेती शाळे मध्ये शेतकऱ्यांनी कंट्रोल प्लॉट व प्रात्यक्षिक प्लॉट यामधील फरक कसा ओळखावा याबाबत आणि सोयाबीन पिकामध्ये तणनाशक ऐवजी अंतर मशागत करावे जेणेकरून आपले जमिनीत सुदृढ पणा जास्त प्रमाणात राहील याची काळजी घ्यावी लागेल याबाबत सखोल मार्गदर्शन केले. श्री विनोद नाईक नवरे यांनी सोयाबीन वर येणाऱ्या खोडकिड खोडमासी पांढरी माशी येलो मोजाक कशाप्रकारे ओळखावा आणि त्याला कशाप्रकारे नियंत्रण करावे याबाबत मार्गदर्शन केले.
प्रात्यक्षिक व शेती शाळा मधील शेतकरी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरील कार्यशाळेमध्ये सूत्रसंचालन तुकाराम सोगावे यांनी केले तर आभार प्रदर्शन विवेकानंद वाडीकर यांनी केले आहे .