• Wed. Apr 30th, 2025

भारत जोडो यात्रा पूर्व तयारी बाबत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी घेतली बैठक

Byjantaadmin

Nov 9, 2022

भारत जोडो यात्रा पूर्व तयारी बाबत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी घेतली बैठक, तयारीचा आढावा घेत काँग्रेस पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांना केल्या सूचना

देशाच्या सामाजिक जडणघडणीला एक दिशा देणारी भारत जोडो यात्रा-माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

लातूर प्रतिनिधी- भारत जोडो यात्रा ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भारत देशाच्या सामाजिक जडणघडणीला एक दिशा देणारी यात्रा आहे, म्हणून आपल्याला यायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हायचे आहे असे आवाहन राज्याचे माजी
वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे नेते राहुलजी गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्र राज्यात आगमन झाले असून नांदेड-देगलूर मार्गे येत्या दोन दिवसांत हिंगोली जिल्ह्यात येत असून त्यांच्या हिंगोली जिल्हा आगमनानिमित्त करण्यात येणाऱ्या पूर्व तयारी अनुषंगाने राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मंगळवार दि. ८ नोव्हेंबर
रोजी लातूर येथील काँग्रेस भवन या ठिकाणी  लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी विविध फ्रंटल पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्वपूर्ण बैठक घेऊन पूर्व तयारी बाबत आढावा घेतला.
यावेळी त्यांनी बैठकीस उपस्थित असलेल्या पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आवश्यक सूचना केल्या. प्रारंभी प्रास्ताविकपर भाषणात बोलताना लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष किरण जाधव यांनी भारत जोडो यात्रेच्या तयारी बद्दलची माहिती यावेळी दिली.
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, भारत जोडो यात्रेला पाठबळ देण्यासाठी म्हणून आज आपण सर्व एकत्र आलेले आहोत.आजवर आपण या यात्रेत अप्रत्यक्षरित्या सामील झालो होतो.११ नोव्हेंबर
रोजी हिंगोली जिल्ह्यात ही यात्रा दाखल होईल तेव्हा या यात्रेचे स्वागत करण्याचा मान लातूर जिल्ह्याला मिळाला आहे हे आपले भाग्य आहे. भारत जोडो यात्रा ही भारताची एकात्मता,समता, बंधुता,ऐक्य हे साकारण्याचा या
यात्रेचा उद्देश आहे. या यात्रेत आपल्याला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हायचे तर आहे पण आपल्या सोबत आपल्या मित्र परिवाराला या यात्रेत आपण सहभागी करून घ्यायचे आहे. आपले अनेक सहकारी हिंगोली मध्ये
तयारी करत तर आहेतच आपणही या यात्रेला गांभीर्याने घ्यावे. भारत जोडो यात्रा ही काँग्रेस पक्षाच्या व भारत देशाच्या सामाजिक जडण घडणीला एक दिशा देणारी यात्रा आहे. आणि म्हणून आपल्याला या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी
व्हायचे आहे. हिंगोलीला जाण्याचा मार्ग, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था करण्यात आली असून या यात्रेत नुक्कड सभा पार पडणार आहे. या यात्रेत काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहभागी होणे हे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.पुढे बोलताना आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की,या भारत जोडो यात्रेत लातूर शहरातील प्रत्येक प्रभागातील कार्यकर्ते,नागरिक तसेच
ग्रामपंचायत,तालुका, व जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,सदस्य,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावे .यासाठी आपणास हिंगोलीजाण्याचा वाहतूक मार्ग,दिनचार्य व वेळोवेळीच्या आवश्यक सूचना सहभागी होणाऱ्या सर्वाना वॉट्स अपच्या माध्यमातून दिल्या जातील, सर्व पदाधिकारी
कार्यकर्त्यांनी आपल्या सोबत ग्रुपने या यात्रेला येणाऱ्याची यादी करून लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीला कळवावे. स्वच्छताकामगार, व्यापारी, महिला भगिनी,इतर इच्छुक नागरिक यांचीही नोंदणी करून घ्यावी. आणि ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजण्या पूर्वी यात्रा स्वागत ठिकाणी पोहचण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. ज्याना दुर्धर आजार असतील
अशाना या यात्रेत सहभागी होण्याचे बंधन असणार  नाही असे सांगत या भारत जोडो यात्रेसाठी उपस्थितसर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी आमदार  वैजनाथ शिंदे, माजी मोईज शेख, किरण जाधव, दीपक सूळ,लक्ष्मण
कांबळे,विजयकुमार साबदे, गोरोबा लोखंडे, सिकंदर पटेल, कैलास कांबळे,युनूस मोमीन, पृथ्वीराज शिरसाठ,आसिफ बागवान, सय्यद ,सचिन मस्के,प्रा.स्मिताताईखानापूरे,सपनाताई किसवे, राजकुमार जाधव, ज्ञानेश्वर सागावे,पंडित कावळे, फारूक शेख,रघुनाथ मदने, गोटू यादव,राजू गवळी,वेंकटेश
पुरी,दगडू अप्पा मिटकरी,ऍड.देविदास बोरूळे पाटील,सुमित खंडागळे, हकीम शेख,गौरव काथवटे, सचिन बंडापल्ले, प्रताप पाटील, महादेव ढमाले,तबरेज तांबोळी,महेश काळे, हरिभाऊ गायकवाड,अभिजित इगे,सुनील पडिले,प्रा.संजय
ओहोळ,सुंदर पाटील कव्हेकर,गिरीश ब्याळे,राम कोंबडे,इसरार सगरे, डॉ. बालाजी साळुंके, पप्पू देशमुख,अकबमाडजे,एकनाथ पाटील,विकास कांबळे,सुरेशगायकवाड,वर्षा मस्के,सुभाष घोडके,दगडू साहेब पडिले,शरद देशमुख,मनोज
देशमुख,रिहाना बासले,विद्याताई पाटील,स्वाती जाधव,संजय पाटील,विजय टाकेकर,रफिक सय्यद,प्रा.एम.बी. पठाण, एम. पी. देशमुख,बिभीषण सांगवीकर,सुमन चव्हाण,कमल शहापुरे, यशपाल कांबळे, बानू शेख,हरून बासले,अविनाश
बत्तेवार, करीम तांबोळी, सुभाष जाधव,अभिशेक पतंगे,सुलेखा कारेपूरकर, केशरबाई महापुरे,विवेक जगताप,राहुल डुमने,अब्दुल्ला शेख,नितीन कांबळे,राज
क्षीरसागर,प्रा.सुधीर आनवले,आनंद वैरागे,आकाश मगर,पवन सोलंकर, विष्णू धायगुडे,बालाजी झिपरे,पवन कुमार गायकवाड,ऍड.अंगद गायकवाड,फारुख शेख,श्रीकांत
गर्जे, गणेश देशमुख, धनंजय शेळके,सत्यवान कांबळे, केतन सातपुते, कुमारअप्पा पारशेट्टी,जफर पटवेकर,शिवाजी कांबळे,गोविंद देशमुख,सुरेशधानुरे,प्रा.शिवाजी

जवळगेकर,रघुनाथ शिंदे, गोविंद डुरे पाटील, ज्योती
सिंघन,अनिता रसाळ, उषा चिकटे,शितल मोरे, संगीता पतंगे, सुधाताई कावळे, किरण बनसोडे, दयानंद कांबळे,महादेव सुर्यवंशी, कैलास माने,वैभवस्वामी,खाजा शेख, रामराव चामे, डॉ.सुधाताई कांबळे यांच्यासह लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या विविध सेलचे पदाधिकारी,सदस्य,कार्यकर्ते
उपस्थित होते. शेवटी या बैठकीस उपस्थित असलेल्या सर्वांचे माजी महापौरप्रा.स्मिता खानापुरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed