उसाच्या उभ्या ट्रॉलीला धडकून डॉक्टरचा मृत्यू
लातूर- जहिराबाद महामार्गावरील घटना
औराद शहाजानी (जि. लातूर): लातूर- जहिराबाद महामार्गावरील तगरखेडा मोडजवळ उसाच्या उभ्या ट्रॉलीला धडक बसल्याने हलगरा येथील डॉ. नीलेश हेडे यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली.
९.३० वाजताच्या सुमारास तगरखेडा मोडजवळ उभे टाकलेल्या उसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोराची धडक बसली. यात डॉ. नीलेश हेडे हे जखमी अवस्थेत जागेवरच पडले होते. याच वेळी पाठीमागून गाडीने येणारे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे यांनी घटनास्थळावर धाव घेऊन डॉ. हेडे यांना प्राथमिक उपचारासाठी औराद येथील खासगी रुग्णालयात पाठवले. यावेळी येथील डॉ. नीलेश दीपक हेडे (३५) रुग्णालयातील डॉक्टरांनी नीलेश हेडे औराद शहाजानी येथील रुग्णालयाचे यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले. हलगरा येथून कामकाज आटोपून गावाकडे जाताना ही घटना घडली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, तीन भावंडे असा परिवार आहे.