• Wed. Jun 18th, 2025

प्रदीप कुरुलकर यांचे तपासात असहकार्य; एटीएसने केली व्हॉईस टेस्टची मागणी

Byjantaadmin

Jul 27, 2023

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुण्यातील एका प्रयोग शाळेचे संचालक राहिलेले वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी शत्रूराष्ट्र असेलेल्या पाकिस्तानी हेराला अतिशय संवेदनशील माहिती दिल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, ते तपसात सहकार्य करत नसल्याची माहिती महराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे महासंचालक सदानंद दाते यांनी दिली. यामुळेच त्यांची व्हॉईस टेस्ट करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.महराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे महासंचालक सदानंद दाते हे बुधवारी पुण्यात होते. यावेळी त्यांनी माध्यमांना ही माहिती दिली. दाते म्हणाले, करूलकर हे तपासात सहकार्य करत नाही. त्यांच्या विरोधात आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. कुरूलकर सहकार्य करत नसल्याने आम्ही त्यांच्या व्हॉईस टेस्टची मागणी न्यायालयाकडे केली आहे. याला करूलकर यांच्या वकिलाने विरोध केला आहे. रंतु या चाचणीसाठी आरोपीच्या परवानगीची गरज नाही. याबाबत न्यायालयाचा निकाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. कुरुलकरविरुद्ध एटीएसने विशेष न्यायालयात एक हजार ८३५ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. कुरुलकर सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

कुरूलकरांनी भारतीय क्षेपणास्त्र यंत्रणा, तसेच सुरू असलेले विविध प्रकल्प या सोबतच ड्रोन तसेच डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे वेळापत्रक देखील पाकिस्तानी गुप्तचर एजंटला दिली. एवढेच नाही तर नुकतेच भारतीय हवाई दलात दाखल झालेल्या राफेल विमानाबाबत देखील त्यांनी पाकिस्तानी हेराला माहिती दिल्याचे त्यांच्या चॅटमध्ये उघड झाले आहे. कुरूलकरांनी अनेक महत्वाची कागदपत्रे आणि ब्ल्यु प्रिंट सोबत गोपनीय आणि संवेदनशील कागदपत्रे त्यांच्या मोबाइलमध्ये सेव्ह केले होते. एटीएसने याप्रकरणातसीआयरपीसी१६१ प्रमाणे ६९ जणांचे तरल तीन साक्षीदारांचे सीरअारपीसी१६४ प्रमाणे जबाब नोंददवून गोपनीय कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *