शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीने गरजूंना अन्नधान्याचे वाटप
निलंगा- शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीने नणंद येथे गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नणंद येथे युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यांच्या हस्ते गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उद्धव जाधव, राम लादे, अभय मिरगाळे, शिवा इंडे,बळवंत तांबाळे, बालाजी नारायणपुरे, सागर कोरके इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.