स्कायलाईन इन्फोटेक कॉम्प्युटर सेंटर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
निलंगा (प्रतिनिधी):-निलंगा शहरातील स्कायलाईन इन्फोटेक कॉम्प्युटर सेंटर मध्ये MSCIT परीक्षेत जून जुलै महिन्यात झालेल्या परीक्षेत यश संपादन केलेल्या 225 विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी 418 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 225 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले होते यात अनुराधा दत्ता कदम ही विध्यार्थिनी प्रथम क्रमांक पटकावला आहे तर शुभांगी मोहन शिंदे या विध्यार्थीनीने द्वितीय क्रमांक पटकावला आहे या विद्यार्थ्यांना ट्रॉफी पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी स्कायलाईन इन्फोटेक कॉम्प्युटर सेंटर चे संचालक पिंटू सगरे, दत्ता पाटील, मीनाक्षी निलंगेकर, मयुरी शिंदे, माहेश्वरी शिंदे, दिपाली चलगंजे,वैभवी जाधव, मुस्कान शेख व सर्व स्टाफ उपस्थित होता.
