निलंगा शिवसेनेकडून भर पावसातही उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
निलंगा /प्रतिनिधी आज निलंगा तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिरामध्ये साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी अभिषेक करून त्यानंतर गोरगरीब महिलांना साडी वाटप व उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रम करीत भर पावसात सुद्धा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा आज वाढदिवस या निमित्ताने निलंगाचे ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिरात साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी अभिषेक करण्यात आला या यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर हडगा नाका येथील शिवसेना संपर्क कार्यालय येथे गोरगरीब महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या फवारणीसाठी लागणाऱ्या दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांना औषधांचे वाटप ही यावेळी करण्यात आले याचबरोबर निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम ही घेण्यात आला अशाप्रकारे विविध कार्यक्रमाने दिवसभर पाऊस सुरू असताना सुद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकाच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना सहकार सेनेचे जिल्हा संघटक विनोद आर्य शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे निलंगा तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष युवराज जोगी निलंगा विधानसभा प्रमुख शिवाजी पांढरे निलंगा शहर प्रमुख सुनील नाईकवाडे धनुभाऊ भुरके उपतालुकाप्रमुख मुस्तफा शेख उपशहर प्रमुख माधव नाईकवाडे संतोष मोघे ज्येष्ठ शिवसैनिक राजपाल पाटील शिवसैनिक दत्ताभाऊ बसपुरे मेघराज पाटील आशिष सुरवसे बबलू सरतापे शिवसेना महिला आघाडीच्या तालुका संघटिका रेखाताई पुजारी शहर संघटिका दैवता ताई सगर सविताताई पांढरे अरुणाताई माने शिराढोण येथील महिला आघाडीच्या कविता बडूरे यांच्यासह असंख्य शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.