• Wed. Jun 18th, 2025

मणिपूरसारखी घटना, सामूहिक अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीला निर्वस्त्र करुन पळवले…

Byjantaadmin

Jul 26, 2023

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठमध्ये मणिपूरसारखी (Manipur Case) धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्यानंतर तिला निर्वस्त्र करुन रस्त्यावरून पळवले. मेरठच्या किठोर पोलीस ठाण्याच्या परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेरठच्या किठोर गावामध्ये तीन महिन्यांपूर्वी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एका तरुणाने अल्पवयीन मुलीला फूस लावून तिला उसाच्या शेतामध्ये नेले. त्याठिकाणी आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीचे मित्र त्याठिकाणी आले. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ  तयार करण्यास सुरुवात केली. त्यांनी देखील तिच्यावर अत्याचार केले.

Meerut Crime News

आरोपींनी यावेळी पीडितेला मारहाण देखील केली. पीडित मुलीला कधी बेल्टने तर कधी काठीने मारहाण केली. त्यानंतर तिला निर्वस्त्र करत उसाच्या शेतातून पळवत रस्त्यावर आणले. ही घटना होऊन तीन महिने झाले. आरोपींनी रविवारी पीडित मुलीच्या बहिणीच्या मोबाईलवर हा व्हिडिओ पाठवला. त्यानंतर तिच्या बहिणीने पीडितेला घटनेविषयी विचारपूस केली. तेव्हा घाबरलेल्या पीडितेने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा ही धक्कादायक घटना समोर आली.याप्रकरणी पीडित मुलीने कुटुंबीयांसोबत किठोर पोलीस ठण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुख्य आरोपी जाहिद आणि त्याचे मित्र जावेद आणि आलम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. तर या घटनेचा व्हिडिओ मोबाइलमध्ये कैद करणारे दोन आरोपी सध्या फरार आहेत. पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *