• Wed. Jun 18th, 2025

कासार शिरसी येथे भव्य मोर्चा…

Byjantaadmin

Jul 27, 2023
निलंगा येथे   केलेल्या चुकीच्या आंदोलनाच्या निषेधार्थ कासार शिरसी येथे भव्य मोर्चा
निलंगा;-   महाराष्ट्र सरकारने कासार शिरसी येथे नुकतेच अपर तहसील मंजूर केले आहे या अंतर्गत परिसरातील 68 गावांचा समावेश आहे यापैकी परिसरातील काही गावकऱ्यांनी राजकीय दबावास बळी पडत आमचा कासार सिरसीअप्पर तहसील कार्यालयात समावेश करू नये या मागणीसाठी सोमवार तारीख 24 रोजी निलंगा येथे उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांना निवेदन  आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुतळ्याचे दहन केले या अप्रिय घटनेचा कासार शिरसीसह या परिसरातील संतप्त नागरिकांनी निषेध मोर्चा काढत पुतळा दहन करणाऱ्या विरुद्ध त्वरित कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन API रियाज शेख व मंडल अधिकारी निटूरकर यांना दिले याप्रसंगी कासार शिरसीसह परिसरातून मोठ्या जनसमुदाय जमला होता .कासार सिरसी तालुका निर्मिती या भागातील सर्व नागरिकांना सोयीचे आहे सर्वांच्या भावनेची कदर करत आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाद्यातून तालुका निर्मितीचे आश्वासन दिले होते त्यानुसार कासार शिरसी ची तालुका निर्मितीकडे वाटचाल आहे पण काही राजकीय मंडळी या भागाच्या विकास खीळ घालण्याचा घाट घालत आहे ज्यांना बाग लावायची नसेल त्यांनी आग तरी लावू नये अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे
सोमवार तारीख 24 रोजी निलंगा येथे विकास रत्न आमदार अभिमन्यू पवार यांचा पुतळा दहन करीत काही गावा नी या अप्पर तहसील अंतर्गतन येण्याची मागणी केली
या निषेधार्थ बुधवार तारीख 26 रोजी कासार शिरसी येथे भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी परिसरातील ग्रामपंचायत सदस्य सरपंच मोठ्या संख्येने हजर होते हा
विराट मोर्चा येथील तांबाळमोड ते बसस्थानक व श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन एका शिष्टमंडळाच्या वतीने प्रशासनास निवेदन देत अघोरी कृत्य करणाऱ्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली या मोर्चात सर्वश्री  मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे सरचिटणीस धनराज होळकुदे शहराध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य गोरख होळकुदे अनिस बागवान युवा मोर्चा अध्यक्ष परमेश्वर बिराजदार सौ माजी सरपंच कल्पना गायकवाड सौ कल्पना ढवले सरपंच कविता गोरे  मधुकर किवडे  नाना धुमाळ प्रशांत गुंडुरे श्रीहरी जाधव  नितीन पाटील जिलानी बागवान ओम बिराजदार बळवंत पाटील प्रशांत येळनुरे श्रीमंत मोरे भास्कर पाटील बाबू तांबोळी हैदर मुत्रे सोमेश्वर बिराजदार  नागोराव राठोड राहुल ईश्वरे बालाजी बिराजदार धोंडीराम बिराजदार यांचे सह मोठा जनसमुदाय जमला होता या निषेध मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *