• Wed. Jun 18th, 2025

किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार; व्हायरल झालेला ‘व्हिडिओ’ खरा

Byjantaadmin

Jul 26, 2023

विरोधकांचा कर्दनकाळ अशी ओळख निर्माण केलेले भाजप नेते किरीट सोमय्या हे त्यांच्या आक्षपार्ह ‘व्हिडिओ’मुळे अडचणीत सापडले आहे. यानंतर मोठ्या आवेशाने या ‘व्हिडिओ’ची सखोल चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली. यानुसार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असता पहिल्याच टप्प्यात हा ‘व्हिडिओ’ खरा असल्याची माहिती पुढे येत आहे. यामुळे सोमय्यांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

भाजप नेतेकिरीट सोमय्याचा’व्हिडिओ’ समाज माध्यमात ‘व्हायरल’ झाला होता. त्या ‘व्हिडिओ’वरून विधिमंडळातही मोठा गदारोळ झाला होता. विधानपरिषदेचे विरोध पक्षनेते आंबादास दानवे यांनी आपल्याकडे ‘पेन ड्राईव्ह’ असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी सोमय्या यांच्यावर महिलांच्या शोषणाचे आरोपही केलेले आहेत.सोमय्यांनीही व्हायरल झालेल्या त्यांच्या ‘व्हिडिओ’ची सखोल करण्याची मागणी गृहमंत्रीfadnvis  यांच्याकडे केली होती. आता हा ‘व्हिडिओ’ खरा असून यात कुठल्याही प्रकारचे ‘मोर्फिंग’ झाले नसल्याची माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली आहे. याबाबत अद्यापह कुठल्याही प्रकारची जाहीर घोषणा करण्यात आलेली नाही. हा ‘व्हिडिओ’ खरा असल्याची स्पष्ट झाले तर सोमय्यांच्या राजकीय अडचणी वाढणार आहेत.आदेशानंतर सोमय्यांच्या आक्षेपार्ह ‘व्हिडिओ’ची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट १० चे पथक चौकशी करणार होते. त्यांना गुन्हे शाखेचे अधिकारी तांत्रिक तज्ज्ञ आणि सायबर पथकातील अधिकाऱ्यांचीही मदत होणार होती. आता सखोल चौकशी केली असता तो किरीट सोमय्या यांचाच असल्याची माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली आहे. आता हा ‘व्हिडिओ’ कुणी ‘व्हायरल’ केला याचा तपास गुन्हे शाखा करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *