• Wed. Apr 30th, 2025

देशात शेतकऱ्यांना उस तोडणी यंत्र कर्जासाठी १०५ कोटी रुपये कर्ज वाटप लातूर बँक पहिल्या स्थानावर

Byjantaadmin

Nov 8, 2022

देशात शेतकऱ्यांना उस तोडणी यंत्र कर्जासाठी १०५ कोटी रुपये कर्ज वाटप लातूर बँक पहिल्या स्थानावर

जिल्हा बँक साखर कारखान दारी मुळे रोजगाराना संधी लातूरचा विकास हेच आमचे एकमेव ध्येय माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन

लातूर जिल्हा बँक व साखर कारखान्यांच्या वतीने ऊसतोडणी यंत्र कलश पूजन शानदार सोहळ्यात संपन्न

लातूर ;/लोकनेते विलासराव देशमुख हे यांच्या दूरदृष्टीमुळे लातूर जिल्ह्याचा विकास झालेला असुन त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून पुढे जाणारे आपण विकासाचे वारकरी आहोत. लातूरचा विकास हेच आपले एकमेव ध्येय आहे. हे ध्येय सदैव समोर ठेवून आपण काम करीत आहोत लातूर जिल्हा बँकेच्या माध्यमातुन तब्बल १०५ कोटी रुपयांची ९१ हार्वेस्टर मंजुर करून त्या मधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करण्याची संधी मिळेल इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्र साठी कर्ज देणारी लातूर जिल्हा बँक राज्यात नव्हे देशात देशात अव्वल स्थानावर असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सांगितले आपल्या कार्यातून लातूर जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीने आणखी पुढे घेऊन जावूया, सहकार चळवळ आणखी मजबूत करुया, असे प्रतिपादन सहकारमहर्षी व माजी मंत्री श्री. दिलीपराव देशमुख यांनी येथे केले. कोरडवाहू शेतकऱ्यांना ताठ मानेने जगता यावे यासाठीही आम्ही नियोजन करून नवी योजना आणत आहोत, असेही ते म्हणाले.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, साखर कारखान्यांच्या आणि न्यू हॉलंड, शक्तिमान व करतार हार्वेस्टर कंपनी यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) येथे आयोजित ऊस तोडणी यंत्राचा (हार्वेस्टर) कलश पूजन सोहळा सहकारमहर्षी व माजी मंत्री श्री. दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार व बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख, आमदार व बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील, मारुती साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, ट्वेंटी वन शुगर चे उपाध्यक्ष विजय देशमुख, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, रेणा चे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, उपस्थित होते व्यासपिठावर माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, मोईज शेख, जिल्हा बँकेचे संचालक अँड श्रीपतराव काकडे, संचालक पृथ्वीराज शिरसाठ ,संचालक अशोक गो विंदपुरकर , व्यंकटराव बिरादार ,संचालक एन आर पाटील, संचालक राजकुमार पाटील संचालक दिलीप पाटील नागराळकर, जयेश माने, संचालक मारोती पांडे, संचालिका सौ स्वयं प्रभा पाटील सौ सपना किसवे, संचालिका सौ अनिता केंद्रे, बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव, अँड किरण जाधव, तात्यासाहेब देशमुख, शक्तिमान कंपनीचे माणिकराव पाटील, न्यू हॉलंड कंपनीचे तुळशीदास टेंभुर्णे, बँ सुभाष घोडके, चांदपाशा इनामदार, संभाजी सूळ, सतीश पाटील, सचिन दाताळ, विवीध साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सर्वश्री बी बी व्हि मोरे, जितेंद्र रनवरे, रवी बरमदे, देसाई, पवार, बँकेचे अधिकारी कर्मचारी व मोठ्या संख्येने शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते.

कोरडवाहू शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आगामी काळात पुढाकार घेणार आहोत

यावेळी बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले, आमच्या सर्वांचा असा विचार आहे की, जे कोरडवाहू शेतकरी आहेत, ज्याच्या शेतात ऊस येऊ शकत नाही, ज्याच्या शेतात सोयाबीन, तुर, हरभरा अशी पिके येतात अशा शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्हाला महत्वपूर्ण पावले उचलायची आहेत. त्याचे नियोजन सुरू आहे. त्याच्या मालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी कशी करता येईल, सहा महिने बॉयलर बंद असतो तो अधिक काळ चालावा, अशा दृष्टीने आम्ही नियोजन करीत आहोत. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना ताठ मानेने जगता येईल.

जिल्हा बँकेचे अनुकरण इतर बँकाने करावे पारदर्शकता असणारी लातूर बँक आदर्श

माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, लातूर जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी आहे. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. ऊस तोडणी यंत्र ही काळाजी गरज आहे. मजूर मिळत नाहीत. यामुळे शेतीत यांत्रिकीकरण गरजेचे आहे. अनेक देशात 100 टक्के यांत्रिकीकरण झाले आहे. लातूरमध्येही त्या दृष्टीने दमदारपणे पावले पडत आहेत. हे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणाऱ्या लातूर जिल्हा बँकेमुळे शक्य झाले, याचे कौतुक आहे. बँकेने पारदर्शकपणे कारभार केला. जिल्हा बँकेचे कार्य इतर बँका अनुकरण करतील असेच आहे. लातूरशी आमची बांधिलकी आहे. ही विलासराव देशमुख साहेबांची शिकवण आहे. तीच परंपरा, तीच शिकवण आम्ही आमच्या लोकहिताच्या कार्यातून पुढे नेत आहोत.

जिल्हा बँक लोकनेते विलासराव देशमुख माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या दूरदृष्टीने सक्षम झाली आर्थिक सुबत्ता आली-आमदार बाबासाहेब पाटील यांचे आवाहन

यावेळी आमदार श्री. बाबासाहेब पाटील म्हणाले, एकेकाळी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे नव्हते, अशी आपल्या जिल्हा बँकेचे स्थिती होती. मोठ्या अडचणीत बँक सापडली होती. अशा स्थितीत विलासराव देशमुख, दिलीपराव देशमुख यांनी दूरदृष्टी ठेवून इथल्या जिल्हा बँकेची आणि इथल्या परिसराची आर्थिक स्थिती बदलली. शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणला. सहकार रुजवला. म्हणून एकत्र राहून विकासाची ही परंपरा आपल्याला पुढे कायम ठेवायची आहे. जनतेनेही विकास करणाऱ्यांसोबत, सर्वसामान्यांची प्रगती करणाऱ्यांसोबत रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले

जिल्हा बँकेने हार्वेस्टर दिल्याने सुशिक्षित लोकांना रोजगारांच्या संधी मिळाल्या केवळ घोषणा केल्या नाही तर अगोंदर केले पुन्हा सांगीतले चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांचे प्रतिपादन

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आमदार श्री. धिरज देशमुख म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे वरुणराजाच्या कृपेमुळे मांजरा धरण, जिल्ह्यातील सर्व बराज तुडुंब भरत आहेत. चांगला पाऊस असल्याने उसाची उच्चांकी लागवड आपल्याकडे होत आहे. त्यामुळे मागच्या वर्षी ऊस गाळपासाठी जाईल की नाही, ही चिंता सर्वांसमोर होती. अशा अडचणीच्या काळात ‘आपल्या शेतातील शेवटचे टिपूर जाईपर्यंत मांजरा परिवार स्वस्थ बसणार नाही’, असे सांगून सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, लातूरचे तत्कालीन पालकमंत्री अमित देशमुख यांनी यंत्रणा उभी केली आणि अडचणीतून मार्ग काढला. शेतकरी बांधवांना दिलासा दिला.

जिल्हा बँकेने ९१ हार्वेस्टर आणि त्यासाठी लागणारी १८० वाहने मंजूर केले आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांचा प्रश्न तर सोडवलाच. शिवाय, शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला. हा दुहेरी आनंद आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना मदत करू, रोजगार उपलब्ध करून देऊ, अशा केवळ आम्ही घोषणा केल्या नाहीत. त्या आधी पूर्ण करून दाखवल्या आणि नंतर सगितल्या, ही आमची कामाची पद्धत आहे, असे श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव यांनी मांडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed