निवासी १२० विद्यार्थ्यांना टॕब, रेनकोटचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते झाले वाटप
निलंगा/प्रतिनिधी दिनदयाळ आश्रम शाळेतील निवासी व गरीब विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने आलेल्या टॕब व रेनकोट भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
निलंगा तालुक्यातील दापका येथील दिनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था संचलित आश्रम शाळेत दिनांक २३ रोजी भटक्या विमुक्त समाजातील निवासी १२० विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र सरकारने १२० टॕब दिले आहेत.त्याच बरोबर पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना रेनकोटही देण्यात आले आहेत.
यावेळी शेषराव ममाळे ,शाळेचे मुख्याद्यापक उमेश नाईक,संस्था चालक दिनेश नाईक,निलेश नाईक ,श्रीधर वतनेवकील,तम्मा माडीबोने,सुमित इनानी,मंचक पांचाळ,प्रदिप पाटील,निलेश अट्टल,शिवशंकर मिरगाळे यांच्यासह शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
