पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र महाविद्यालयाच्या श्रुती पवार व यशोदा पाटील यांची विद्यापीठ संघात निवड
निलंगा:-दिनांक ८ ते ११ नोव्हेंबर २०२२ या काळात पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ बास्केटबॉल महिला स्पर्धा श्री वैष्णव विश्वविद्यालय,इंदोर, मध्य प्रदेश येथे होणार आहेत. येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ बास्केटबॉल महिला स्पर्धेसाठी महाराष्ट्र महाविद्यालय,निलंगा श्रुती पवार व यशोदा पाटील या विद्यार्थिनींची निवड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बास्केटबॉल महिला संघामध्ये झाली आहे. ही निवड निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालय दिनांक २० व २१ ऑक्टोंबर या काळात झालेल्या आंतरविभागीय आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धे मधला परफॉर्मन्स पाहून स्पर्धेमधून झाली आहे. तसेच दिपाली सोळुंके या विद्यार्थिनीची निवड नुकत्याच अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हॉलीबॉल महिला स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड च्या व्हॉलीबॉल महिला संघामध्ये झाली होती. या सर्व विद्यार्थिनीना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. गोपाळ मोघे यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. विजय पाटील निलंगेकर, सचिव मा. बब्रुवान सरतापे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, डॉ. धनंजय जाधव, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे