रेणा साखर कारखान्याचा 17 व्या गळीत हंगामाचा शानदार शुभारंभ संपन्न
मांजरा परीवाराच्या माध्यमातून ऊस उत्पादकांच्या जिवनात अच्छे दिन-माजी मंत्री.दिलीपरावजी देशमुख यांचे प्रतिपादन
रेणापूर प्रतिनिधी;-गळीत हंगाम 2022-23 मध्ये रेणा सह.साखर कारखाना कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊसाचे वेळेवर गाळप करील व त्या माध्यमातून शेतक-यांना अर्थिक आधार देण्याची यशस्वी परंपरा कायम ठेवून शेतकऱ्यांच्या जीवनात अच्छे दिन आणण्याचे काम मांजरा साखर परिवाराच्या माध्यमातुन झालेले आहे असे प्रतिपादन रेणा कारखान्याचे संस्थापक तथा माजी मंत्री .दिलीपरावजी देशमुख यांनी केले ते
रेणा कारखान्याच्या 2022-23 च्या 17 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे संस्थापक, माजी क्रिडा व युवक कल्याण मंत्री, म.राज्य मा.श्री.दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या शुभहस्ते माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्य मंत्री,मा.आ.श्री.अमित विलासरावजी देशमुख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हा मध्य.सह बँकेचे चेअरमन मा.आ.श्री.धिरज विलासरावजी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमास माजी आमदार त्र्यंबकराव भिसे, व जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, रेणा कारखान्याचे माजी चेअरमन श्री.यशवंतराव पाटील, श्री संत मारोती महाराज कारखान्याचे चेअरमन श्री.गणपतराव बाजुळगे, मांजरा कारखान्याचे व्हा.चेअरमन श्रीशौल्य उटगे, ट्वेन्टी वन कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री.विजय देशमुख, विलास कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री.काळे, श्री संत मारोती महाराज कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री.शाम भोसले, रेणाचे चेअरमन श्री सर्जेराव मोरे, व्हा.चेअरमन अनंतराव देशमुख, संचालक श्री.धनराज देशमुख, श्री.संजय हरिदास, श्री.प्रेमनाथ आकणगिरे, श्री.संग्राम माटेकर, श्री.प्रविण पाटील, संभाजी रेड्डी, श्री.शहाजीराव हाके, श्री.तानाजी कांबळे श्री. लालासाहेब चव्हाण, श्री.अनील कुटवाड, संचालीका सौ.वौशालीताई माने, सौ.अमृताताई स्नेहलराव देशमुख, मांजरा कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.रनवरे साहेब, विलास युनीट 1 चे कार्यकारी संचालक श्री.देसाई साहेब, श्री संत मारोती महाराज कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.बी.बरमदे रेणाचे कार्यकारी संचालक बी.व्ही.मोरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवार दि.07 नोव्हेंबर 2022 रोजी गव्हाणीत ऊसाची मोळी टाकुन गळीत हंगाम शुभारंभ करण्यात आला.पुढे बोलताना माजी मंत्री तथा संस्थापक दिलीपराव देशमुख म्हणाले की, कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादकांच्या जिवनात प्रत्यक्षात अच्छे दिन आणन्याचा प्रयत्न राहील व आता आपल्या कारखान्याची स्पर्धा राज्यामध्ये नसून बाहेर राज्याशी राहणार आहे आणि यामध्ये यश मिळवणे आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून शक्य होईल. आपण सर्व मांजरा परीवाराचे सदस्य आहात आणि परीवाराच्या प्रमुखावर आणि आपल्या संस्थारूपी मंदीरावर जर कोणी खोटे आरोप करत असतील तर त्यांना जागेवरवरच योग्य ते उत्तर देण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी प्रत्येक जन पार पाडतील असा विश्वास व्यक्त करून रेणा कारखान्यास गळीत हंगामासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असताना मांजरा परीवाराकडून ऊस उत्पादकांची अर्थव्यवस्था सुधारली !-
माजी मंत्री,मा.आ.श्री.अमित विलासरावजी देशमुख यांचे प्रतिपाद
रेणा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2022-23 शुभारंभ प्रसंगी आपल्या मनोगतात माजी मंत्री,मा.आ.श्री.अमित विलासरावजी देशमुख साहेब म्हणाले की, सद्या देशाची आर्थिक व्यवस्था खालावली आहे परंतू मांजरा परीवाराने मागील हंगामात कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊसाचे गाळप करून प्रती टन रू.2700/- पर्यंत देवून ऊस उत्पादकांची आर्थिक घडी सुधारण्यास हातभार लावला यांचे मांजरा परीवाराचा एक सदस्य म्हणुन मला अभिमान वाटतो असे मत व्यक्त केले व रेणा कारखान्यास गळीत हंगामासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
रेणा कारखान्याचे आर्थिक नियोजन कौतुकास्पद !-आमदार धिरज विलासराव देशमुख
रेणा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2022-23 शुभारंभ प्रसंगी आपल्या मनोगतात आमदार धिरज विलासरावजी देशमुख म्हणाले की, रेणा कारखान्याचे आर्थिक नियोजन खरोखर कौतुकास्पद असल्याचा लातूर जिल्हा मध्य.बँकेचा मी चेअरमन असल्यामुळे मला प्रत्यय आला. कारखान्याने बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता भरण्याची मुदत पुढे असताना कारखान्याने मुदतपुर्वी हप्ता भरणा केला असून सहकार क्षेत्रास आदर्श घ्यावा असा रेणा कारखान्याचा कारभार असल्याचे सुचीत करून त्यामुळे आमची बँक कारखान्यास गरज पडेल तेव्हा अर्थ सहाय्य करण्यास तयार असल्याचे मत व्यक्त केले व रेणा कारखान्यास गळीत हंगामासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुरवातीस कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.बि.व्ही.मोरे यांनी आपल्या प्रास्तावीकपर भाषणात कारखान्याने हंगामासाठी केलेल्या तयारीचे सविस्तर विवेचन केले व कारखान्याचें चेअरमन श्री.सर्जेराव मोरे साहेंब यांनी कारखान्याच्या उभारणीपासून केलेल्या प्रगतीचा आढावा उपस्थितासमोर मांडला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सचीन सुर्यवंशी यांनी केले तर शेवटी कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री अनंतराव देशमुख यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले