डॉ.निलंगेकर साखर कारखाण्याचे लाखो रुपये केले परत ….
निलंगा ;-डॉ शिवाजीराव पाटील- निलंगेकर सहकारी साखर कारखाना लिज ओमकार साखर कारखाना लि. जाजनूर झरी या साखर कारखान्याचे नजर चुकीने निलंगा येथील जेष्ठ संपादक (पत्रकार) मोहन क्षिरसागर यांच्या वृत्तपत्राच्या खात्यावर ०४ लाख ९५ हजार रुपये जमा झाले होते.
मात्र येथील प्रामाणिक पत्रकार मोहन क्षिरसागर यांनी तात्काळ बँकेशी संपर्क साधून सदर खात्यात जमा झालेल्या रक्कमे विषयी बँकेशी विचारपूस केली असता सदरील रक्कम ही ऊसतोड मुकादमाच्या खात्याशी समंधीत होती.
सदरील रक्कम ही बँकेच्या कर्मचाऱ्याकडून नजर चुकीने खात्यावर जमा झाले असल्याचे स्पष्ट झाले.
वास्तविक पाहता एकदा बँक खात्यावर जमा झालेली रक्कम ही सदरील खातेदाराच्या संमती शिवाय वापस घेता येत नाही.
मात्र नेहमीच प्रामाणिक असलेले पत्रकार मोहन क्षिरसागर यांनी आपला प्रामाणिकपणा दाखवून कारखान्याचे व वृत्तपत्राचे कसल्याही स्वरूपाचे आर्थिक व्यवहार नसल्यामुळे त्यांनी तात्काळ बँकेशी संपर्क साधून क्षणाचाही विलंब न लावता सदरील रक्कम समंधितांना परत केली. त्यांच्या या प्रमाणिकतेमुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.