खरोसा व शिवणी (लख)येथील शेकडो नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराच लाभ
– शिवसेनेचे औसा तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे यांच्या हस्ते झाले उदघाटन
लातूर- शिवसेना वर्धापन दिन व पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांच्या कुशल नेतृत्वात माजी आमदार दिनकरराव मानेसाहेब
यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका प्रमुख तानाजी सुरवसे यांच्या पुढाकाराने संपूर्ण औसा तालुक्यात हिंदुह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेतून लातूर जिल्हा शिवसेना व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे शिवसेना उपनेते तथा मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुरकर यांच्या सूचनेवरून औसा तालुक्यातील 105 गावामध्ये १४ जून ते ३१ जुलै या कालावधीत आरोग्य चिकित्सा, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिरे घेण्यात येत आहेत. आज दिनांक २३जुलै रोजी शिवणी लक व खरोसा या गावात आरोग्य चिकित्सा व रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात दोन्ही गावातील शेकडो रुग्णांनी घेतला लाभ,या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
खरोसा व शिवणी लखं येथील या शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे औसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले.
.यावेळी लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या टीमचे डॉ.रवींद्र चव्हाण ,डॉ. शरद चव्हाण ,डॉ. शुभम भोसले हे सर्व डॉक्टर्स तसेच लातूर ब्लड बँकेचे डॉ. नयन पाटील व त्यांची टीम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आरोग्य व नेत्र तपासणी शिबाराबद्धल माहिती देत औसा तालुक्यातील सदर आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे यांनी केले.
तसेच या शिबिरामध्ये सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, गुडघेदुखी, कंबर दुखी या सर्व तपासण्या होऊन त्याच ठिकाणी नागरिकांना चस्मे व औषध उपचार देण्यात आले यावेळी उपस्थित
शिवसेना जिल्हाप्रमुख श्री शिवाजीराव माने साहेब,शिवसेना तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे, शिवसेना औसा तालुका अल्पसंख्यांक सेलचे सलीम पटेल, वाहतूक सेनेचे तानाजी जाधव उप तालुकाप्रमुख दीपक मुसांडे, उप तालुका प्रमुख प्रवीण बालगीर, शिवणी लक गावचे सरपंच रवी पवार शाखाप्रमुख अरुण पवार, बलभीम गायकवाड शरद जाधव समाधान गायकवाड विवेक पाटील वैभव पवार सतीश चव्हाण किशोर पवार शंकर वरवटे मधुकर मोरे अशोक पवार तुकाराम कदम बाबू पवार मधुकर पाटील अरविंद जय मल्हार लक्ष्मण मोरे सुधाकर पाटील नंदकुमार चव्हाण दीपक बिराजदार जानकाबाई पवार सुरवसे रेखाबाई आळणे, पवार सुमनबाई कुंभार सह गावातील शिवसैनिक गावकरी मोठया संख्येने उपास्थित होते.