• Fri. Jun 20th, 2025

९ वर्षे सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची मल्टिमीडिया चित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद : महिलांसाठी खास पौष्टिक भरड धान्य पाककृती स्पर्धा संपन्न

Byjantaadmin

Jul 23, 2023

९ वर्षे सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची मल्टिमीडिया चित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

महिलांसाठी खास पौष्टिक भरड धान्य पाककृती स्पर्धा संपन्न

केंद्रिय संचार ब्यूरो सोलापूर व जिल्हा प्रशासन यांचा विशेष उपक्रम

लातूर दि.२३ ( जिमाका ) भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय केंद्रिय संचार ब्यूरो सोलापूर व जिल्हा प्रशासन लातूर यांच्या वतीने आयोजित केंद्र शासनाची ९वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्यानाची मल्टिमीडिया चित्र प्रदर्शनाला विद्यार्थी युवा, महिला, लोकप्रतिनिधी आणि नागरिककानी मोठ्या संख्येने भेटी दिल्या.

सदर चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर प्रदर्शनाचे आयोजन प्रशासकीय इमारत कार्यालय, औसा येथे दिनांक २२ व २३ जुलै रोजी या दरम्यान करण्यात आले होते.

या प्रदर्शनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली भारताने माघील ९ वर्षात विविध क्षेत्रात केलेली कामगिरी, देशात जलदगतीने होत असलेल्या विकासकामे, विविध उपक्रम आणि धोरणांची माहिती या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहे. सोबतच गरीब वंचित, आदिवासी, महिला, युवा, शेतकरी, उद्योजक यांच्या विकासासाठी घेण्यात आलेले निर्णय, उज्वला गॅस योजना, डिजिटल इंडिया, पंतप्रधान पीक विमा योजना, किसान सन्मान योजना, आवास योजना, पीएम श्री योजना सह आरोग्य, कृषी, पर्यावरण, क्रीडा, अवकाश आणि विविध क्षेत्रातील संशोधन या क्षेत्रामधील प्रगती व विकासासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची आणि कल्याणकारी व लोकाभिमुख योजनांची माहिती चित्र, मजकूर, डिजिटल स्क्रीन आणि एल ई डी टीव्हीच्या माध्यमातून नागरिकांनी माहिती घेतली. तसेच केंद्र शासनाच्या ९ वर्षातील कामगिरीवर समाधान व्यक्त केले.

केंद्र शासनाने ९ वर्षात घेतलेलं निर्णय, उपक्रम , धोरण आणि विविध कल्याणकारी योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याच्या उदेशाने या मल्टिमीडिया चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरड धान्ये वर्ष २०२३ या निमित्ताने चित्र प्रदर्शनामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना, औसा यांच्या सहकार्याने तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची भरड धान्यापासून बनविण्यात आलेल्या पौष्टिक खाद्यपदार्थांची पाककृती स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये ज्वारी, नाचणी, बाजरी आणि मक्याचे पीठ आणि त्यांच्या कोंड्यापासून थालपीठ, सांजा, धपाटे, मुटके, कोडबळे, डोसा, पोळी, खिचडी, उसळ,आप्पे, शंकरपाळे, लाडू, पापड, चिवडा, घुगरी, शिरा यासारख्या पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांची मांडणी करण्यात आली होती. हे पदार्थ लहान बालके, गर्भवती व स्तनदा मातां, महिला आणि नागरिकांनी निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी अश्या आहाराचे दैनंदिन जीवनात समाविष्ट करावे,या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आल्याची माहिती क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली आहे.
यावेळी उपस्थित विशेष अतिथी पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आले. यावेळी बाल विकास अधिकारी किशोर गोरे, सहायक प्रचार अधिकारी अंबादास यादव आणि नायब तहसिलदार इंद्रजीत गरड, औसा प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका एन एस कांबळे, जे डी ढेगळे, एस एच कटके, जी एम कोदळीकर, एस बी पाटील, किल्लारी प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका व्ही एस कांबळे, एल पी ओव्हाळ, पी के गुगळे, एस व्ही भोसले, पी डब्लू वाहुळे, कार्यालय सहायक जे एम हनुरे आणि बाळ विकास कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
******

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *