• Fri. Feb 6th, 2026

महाराष्ट्र महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन संपन्न

Byjantaadmin

Jul 22, 2023
वाणिज्य मंडळाचे उद्घाटन संपन्न
निलंगाः येथील महाराष्ट्र महाविद्यालयात शै. वर्ष २०२३-२४ साठी गठीत वाणिज्य मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. बॅंकर्स पॅाईंट, लातूरचे संचालक प्रा. बाळासाहेब दहीफळे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते तर डॅा. गोरोबा खुरपे व प्रा. आरीफ शेख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी कु. कांबळे श्रुती हिची वाणिज्य मंडळ अध्यक्ष तर कु. शेख अंजूम हिची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. माधव कोलपूके कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. डॅा. नरेश पिनमकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर डॅा. ज्ञानेश्वर चौधरी, डॅा. गोविंद शिवशेट्टे व  डॅा. सुर्यकांत वाकळे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. प्रा. दहीफळे यांनी बॅंकिंग क्षेत्रातील तसेच विविध  स्पर्धा परीक्षा संधींबाबत सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी उन्हाळी २०२३ परीक्षेत वाणिज्य विभागातून गुणवत्तायादीत पहिल्या दहामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कु. वैभवी जाधव, प्रसाद काळे, कु. निकिता सोळुंके, कु. सुलक्षणा जगताप, कु. सोनल लोकरे, नाईकवाडे विश्वजीत, खोत ज्ञानेश्वर, कु. गोल्डी लांडगे, कु. आश्विनी कांबळे व कु. पेठकर दुहिता यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. रोहिणी पेठकर व कु. धनश्री गवारे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. संदिप सुर्यवंशी, प्रा. अक्षय पानकुरे, प्रा. वैभव सुर्यवंशी, श्री सिद्धेश्वर कुंभार, श्री गणेश वाकळे, विवेक कावळे व बबलू पाटील आदींनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *