• Fri. Jun 20th, 2025

शेतकऱ्याच्या प्रश्नाला वाचा फोडून शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे रहा-जिल्हाप्रमुख शिवाजी माने

Byjantaadmin

Jul 22, 2023
शेतकऱ्याच्या प्रश्नाला वाचा फोडून शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे रहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आदेश – जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांचे प्रतिपादन
 खरोसा येथे नेत्रचिकित्सा व सर्व रोग निदान शिबिर
शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे  यांच्या प्रेरणेतून लातूर जिल्हा शिवसेना व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या संयुक्त वीद्यमाने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे  शिवसेना उपनेते तथा मराठवाडा सचिव विश्वनाथज नेरूळकर  शिवसेना लातूर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण, यांच्या सूचनेनुसार शिवसेना लातूर जिल्ह्याचे  जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, यांच्या कुशल नेतृत्वात*लोकनेते माजी आमदार दिनकरमाने  यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे यांच्या पुढाकाराने औसा तालुक्यातील 105 गावांमध्ये आरोग्य चिकीत्सा व रोगनिदान,नेत्र चिकित्सा शिबिरचे आयोजन करण्यात आले आहे  खरोसा येथील शिबिराच्या उद्घघाटनाप्रसंगी शिवाजीराव माने म्हणाले की शिवसेना ही नेहमी सर्वसामान्यांच्या सेवेसाठी तत्पर असणारे संघटना आहे आणि राहणार आहे याच अनुषंगाने लातूर जिल्ह्यामधील औसा तालुक्यातील 105 गावांमध्ये नेत्रचिकित्सा व आरोग्य शिबिराचा आयोजन  आज पर्यंत 57 गावांमध्ये नेत्र चिकित्सा व आरोग्य शिबिराचे आयोजन करून हजारो लोकांना या शिबिराचा फायदा झालेला आहे याच अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस या वाढदिवसाच्या औचित्य साधून औसा तालुक्यातील 105 गावांमध्ये होऊ घातलेल्या आरोग्य शिबिराचं आयोजन हे अत्यंत चांगल्या पद्धतीने होत असून याचबरोबर काल टीव्हीवरून सायंकाळी बातमी आली मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचा विचार येत आहे याबाबतचे माजी विभागीय आयुक्त केंद्रीकर यांनी दिलेली मुलाखत ही बातमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांनी पाहिली आणि मराठवाड्यातील सर्व जिल्हाप्रमुख शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिला मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येच्या विचारात आहेत ही बाब माझ्या मनाला अत्यंत वेदना देणारे असून कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन चर्चा जे काही करता येईल त्या पद्धतीने करून शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे रहा मराठवाड्यातल्या एकही शेतकऱ्याच्या मनात आत्महत्येचा विचार येऊ नये यासाठी तुम्हाला जे काही करता येईल ते तुम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना केलं पाहिजे असा आदेश पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे म्हणून आज मी जिल्हाप्रमुख या नात्यांना आपणास नम्र विनंती करतोय तमाम शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती करतोय असा विचार अजिबात मनात आणू नका या महाराष्ट्रामध्ये निश्चितच पुन्हा एकदा उद्धव  बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखात सरकार शेतकऱ्याचे हित जोपासणारे सरकार येणार आहे शेतकऱ्याच्या व्यथा अडीअडचणी सर्व जाणून घेऊन शेतकऱ्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी शिवसेना सदैव आणि सदैव तुमच्या सोबत आहे असा मी तुम्हाला शब्द देतोय या भागातल्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गावांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  बाळासाहेब ठाकरे हे शेतकऱ्यांसोबत आहेत याची जाणीव शेतकऱ्याला करून देण्यासाठी अशा पद्धतीचे नियोजन करावे असे आव्हान जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी केले शेतकऱ्यावर निसर्गाचे अवकाळी कृपा शासनाचे उदासीन धोरण यामुळे शेतकरी चिंतेत आहे आर्थिक अडचणीत आहे आजच्या सरकारला शेतकऱ्या बद्दल शेतमजुरा बद्दल सुशिक्षित बेरोजगार बद्दल महिलांच्या सुरक्षेबद्दल काम करण्यासाठी वेळ नाही त्यांना फक्त सत्तेत राहण्यासाठी आवश्यक्य असणारा आकडा मंत्रिपद कसे टिकेल सत्ता माझ्याकडेच कसं राहील हे षडयंत्र आखण्यात मग्न असणार भारतीय जनता पार्टी मिंदे गट राष्ट्रवादीचा फुटीर गट यांच्यातच मग नाहीत शेतकऱ्याकडे किंवा इतर प्रश्नाकडे बघायला त्यांच्याकडे वेळ नाही परंतु त्यांना शेतकऱ्याकडे बघण्यासाठी शिवसेना भाग पाडेल प्रसंगी रस्त्यावर उतरू आंदोलन करून मोर्चे करू तुमच्यासाठी शिवसैनिक रक्त सांडायला तयार आहे तुम्ही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार मनात आणू नका पक्षप्रमुखांना दिलेला आदेश तुमच्यासाठी आम्ही तंतोतंत पाडून शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून या शिबिराच्या माध्यमातून खरोसा गावातील गरजू लोकांनी या शिबिराचा फायदा घ्यावा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी केले या  कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे यांनी केले तानाजी सुरवसे म्हणाले की आम्ही सर्वजण शेतकऱ्याची लेकरं असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे आहोत जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना 57 गावांमध्ये आयोजित झालेलं आरोग्य शिबिर हजारो लोक त्यांना फायद्याचे ठरलेलं असून 105 गाव होईपर्यंत अविरत सदरील शिबिर चालू राहणार आहे सदरील शिबिराच्या माध्यमातून आम्ही जनतेची सेवा प्रामाणिकपणे करणार आहोत वेगवेगळे विषय घेऊन आंदोलन असतील मोर्चे असतील सगळं करून सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे उदगार तानाजी सुरवसे यांनी केले या प्रसंगी उपस्थित
 शिवसेना जिल्हाप्रमुख श्री शिवाजीराव माने साहेब शिवसेना तालुकाप्रमुख श्री तानाजी सुरवसे तालुकाप्रमुख दीपक मुसंडे शिवसेना वाहतूक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तानाजी जाधव शिवसेना अल्पसंख्यांक सेलचे तालुका अध्यक्ष सलीम पटेल खरोसा गावचे सरपंच अजय साळुंखे चेअरमन अमोल सांडूर माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव गोरे माजी उपसरपंच शहाजी कांबळे उपसरपंच विशाल माळी बाळासाहेब सांगवे ग्रामसेवक राजकुमार तोडकर रत्नदीप जाधव विकास गोरे भरत कांबळे रोहित माळी अमोल सांडोर लक्ष्मण बिरादार सुकुमार जाधव विशाल जावळे संदीप माळी गहिनीनाथ साकोळे मारुती माळी मोतीराम जावळे विकास गोरे सोमनाथ पोवाडे राजेंद्र दुबे लक्ष्मण बिराजदार संदीप माळी मनमत स्वामी इस्माईल शेख सोमनाथ स्वामी रामकुमार प्रशांत पाटील प्रशांत डोके सोमनाथ शिरसागर तसेच खरोसा गावातील शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *