• Sat. Jun 21st, 2025

धक्कादायक… राहत्या घरात सापडले ४ मृतदेह, खून की आत्महत्या?

Byjantaadmin

Jul 21, 2023

सातारा : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सणबूर येथे एकाच कुटुंबातील चौघांचे राहत्या घरी मृतदेह सापडले. आनंदा पांडुरंग जाधव (वय ७५), पत्नी सुनंदा आनंदा जाधव (वय ६५), मुलगा संतोष आनंदा जाधव (वय ४५) व विवाहित मुलगी पुष्पलता प्रकाश धस (रा. मंदुळकोळे, ता. पाटण) अशी मृतांची त्यांची नावे आहेत. एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे ढेबेवाडी विभाग हादरला आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील सणबूर येथील आनंदा पांडुरंग जाधव, पत्नी सुनंदा आनंदा जाधव, मुलगा संतोष आनंदा जाधव व विवाहित मुलगी पुष्पलता प्रकाश धस (रा. मंदुळकोळे) हे आज सकाळी चार जण झोपलेले स्थितीत मृत आढळून आले. काही दिवसापासून आनंद जाधव हे आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी त्यांना कृष्णा हॉस्पिटल कराड येथे हलवण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी त्यांना तिथून घरी सोडण्यात आले.

satara patan crime news 4 death body found in sanbur

रात्री सणबूर येथील राहत्या घरी त्यांना ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली होती. लाईट नसल्यामुळे जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्यासोबत पत्नी, मुलगा व मुलगी असे चौघेजण या ठिकाणी होते. गुरुवारी रात्री विवाहित मुलगी पुष्पलता धस यांच्या मुलाने फोनवरून संपर्क साधून आजोबांच्या तब्येतीची विचारपूसही केली होती.सणबूर येथे ही घटना घडली, ते घर आडबाजूला आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा त्याने फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही फोन उचलत नसल्याने शेजारील व्यक्तींना संपर्क करून घरी विचारपूस करण्यात सांगितले. शेजारील काही लोक घरी गेले असता त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र, आतून दरवाजा बंद होता. त्यामुळे आतून कोणताही प्रतिसाद येत नव्हता.शेजारील लोकांनी दरवाजाची कडी तोडून आत पाहिली असता वर शहारे आणणारे दृश्य दिसले. घरातील चारही जण अंथरुणावर मृत अवस्थेत पडलेले दिसले. ही घटना वाऱ्यासारखी सणबूर परिसरात पसरली. एकाच वेळी एकाच कुटुंबातील चार व्यक्तींबाबत ही घटना घडल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *