विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या वतीने लातूर तालुक्यातील महाराणा प्रतापनगर येथे अन्नप्रक्रिया उद्योग योजनेमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी कॅम्पचे आयोजन
लातूर (प्रतिनिधी): (गुरूवार दि. २० जूलै २०२३)विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या वतीने लातूर तालुक्यातील महाराणा प्रतापनगर येथे महिलांना आर्थिक स्वालंबन, स्वंयरोजगार निर्मिती करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध योजना विषयी तसेच कृषी विभागाच्या वतीने सुरू असलेले प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनाबाबत जनजागृती करून
गरजू महिलांना एकत्रित करून त्यांचे अन्नप्रक्रिया उद्योग योजनेमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी त्या योजनेचे फॉर्मचे वाटप आणि ते भरण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. ट्वेंटीवन ॲग्रीच्या संचालिका अदिती अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवार दि. २० जूलै रोजी २०२३ रोजी लातूर तालुक्यातील महाराणा प्रतापनगर येथे या नोंदणी मोहिमेस प्रारंभ करण्यात करण्यात आला आहे. त्याचबरोबर आवश्यक ती मदत आज फाउंडेशनच्या वतीने गावातील महीलांना करण्यात आली. यावेळी 24 महिलांचे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून जास्तीत जास्त महिला सक्षम व्हाव्या यासाठी फाउंडेशनच्या वतीने कार्य सुरू केले आहे. यावेळी फाऊंडेशनच्या समनव्यक संगीता मोळवणे, सरपंच संगीता पतंगे, गावातील महिला व सोशल प्लॅनर गजानन बोयणे उपस्थिती होते.