• Sat. Feb 7th, 2026

महादेवी पाटील यांची राष्ट्रवादी  महिला काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस पदी निवड

Byjantaadmin

Jul 19, 2023
महादेवी पाटील यांची राष्ट्रवादी  महिला काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस पदी निवड
निलंगा(प्रतिनिधी):- 2006 पासुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रीय कार्य करणाऱ्या निलंगा तालुक्यातील महादेवी पाटील यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस पदी निवड करण्यात आली.  यापूर्वी महादेवी पाटील  राष्ट्रवादी काँग्रेस महिला  निलंगा तालुकाध्यक्ष म्हणून 10 वर्ष  तर  राष्ट्रवादी काँग्रेस महिला लातुर  जिल्हा उपाध्यक्ष म्हणून 4 वर्ष कार्य केले आहेत .ही निवड राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण यांनी केली आहे.मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे महादेवी पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले.संसदरत्न   खा. सुप्रियाताई सुळे व  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  माजी मंत्री आ.जयंत पाटील मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैशालीताई मोठे यांनी कामाची दखल घेऊन व लातुर महिला जिल्हा अध्यक्ष मिनाक्षीताई शिगडे यांच्या शिफारसी वरून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विद्याताई चव्हाण यांनी  ही नियुक्ती केली आहे. ही निवड झाल्यानंतर महादेवी पाटील म्हणाल्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला संघटन अधिक मजबूत करणार असून शरद पवार साहेबांच्या विचार,महिला धोरण सर्व सामान्य महिला पर्यंत पोहचविणार आहे.महादेवी पाटील यांच्या या निवडीबद्दल त्यांनी पक्षश्रेष्ठींनी जो विश्वास दाखविला त्या बद्दल आभार व्यक्त केला आहे .महादेवी पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश चिटणीस पदी निवडीबद्दल जिल्ह्यातील पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *