• Sat. Feb 7th, 2026

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

Byjantaadmin

Jul 19, 2023

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

  • 31 जुलै रोजी प्रारूप मतदार यादी होणार प्रसिद्ध

लातूर,  (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाच्या 6 जुलै 2023 रोजीच्या आदेशानुसार जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे 30 जून 2023 अखेर रिक्त झालेल्या सदस्य, थेट सरपंच पदांच्या पोटनिवडणुकीसाठी संगणकीकृत पद्धतीने मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली आहे.

यासाठी 1 जुलै 2023 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार असून प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी 31 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध होईल. दिनांक 31 जुलै 2023 ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे श्री. महाडिक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *