• Sun. Jun 22nd, 2025

शिवसेना लातूर जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडे मारवा आंदोलन

Byjantaadmin

Jul 18, 2023
शिवसेना लातूर जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडे मारवा आंदोलन व पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली
आज दिनांक 18 जुलै 2023 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये किरीट सोमय्या भाजपा माजी खासदार यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन घेण्यात आले. दोन दिवसापासून किरीट सोमय्या यांचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्यामार्फत प्रसारित होत आहे .खास करून लोकशाही न्यूज या चॅनलवरून किरीट सोमय्या याच्या हलकट हरकती दिसून येत आहेत. किरीट सोमय्या हा लिंग पिसाट माणूस असून त्यांनी केलेले कृत हे निश्चितच साधुसंताचा असणारा महाराष्ट्र विचारवंताचा महाराष्ट्र महिलाचा सन्मान राखणारा महाराष्ट्र या महाराष्ट्राला शरमेन मान खाली घालवणारा हा व्हिडिओ आहे. महाराष्ट्रातील् तमाम मायमाऊल्या, भगिनी, प्रचंड प्रमाणात चिडलेल्या असून किरीट सोमय्या यांच्या बद्दल संतापाची लाट निर्माण झालेली आहे. स्वतःला सुसंस्कृत अशा भारतीय जनता पार्टीचा मी प्रवक्ता ,पदाधिकारी म्हणून मिरवणारा हा लिंग पिसाट माणूस स्वतःची खरी ओळख व पक्षाचा खरा चेहरा दाखवून देत आहे. भारतीय जनता पार्टी सोडून इतर पक्षाच्या लोकांवर खोटे नाटे आरोप भ्रष्टाचाराचे करायचे सुटकेस, ट्रक, गाडी, भरून पुरावे आहेत असं सांगायचं खोट्या-नट्या पुराव्यात अडकवून इतर पक्षातल्या लोकांना भारतीय जनता पार्टीत घ्यायचं यासाठी केंद्र सरकारचा सत्तेचा दुरुपयोग करून ईडी , सीबीआय , इन्कम टॅक्स या सारख्या संस्थाचा गैरवापर करून एक तर भाजपात या किंवा जेलमध्ये जा असा दम देऊन  पक्षात प्रवेश द्यायचा इतके भ्रष्टाचाराचे पुरावे असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीत घेऊन किंवा सोबत घेऊन मंत्रिमंडळात सामील करायचं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेल आहे. याच भाजपाचा किरीट सोमय्या हा भारतीय जनता पार्टी तमाशा महामंडळ सहर्ष सादर करीत आहेत नरेंद्र मोदी अमित शहा सहाय्यक कलाकार म्हणून देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार प्रवीण दरेकर हे सगळे मिळून एखाद्या तमाशाला लाजवेल असं वक्तृत्व करत आहेत आणि वागत आहेत परंतु महाराष्ट्रातली जनता हे सगळं आता निमुटपणे सहन करणार नाही या किरीट सोमय्यानं कालचं केलेलं वर्तन संपूर्ण महाराष्ट्राला बदनाम करणार असून या किरीट सोमयाच्या विरोधात आज फक्त प्रतिकात्मक जोडे मारो आंदोलन केलेलं आहे. हा नीच प्रवृत्तीचा माणूस लातूर जिल्ह्यात आला तर प्रत्यक्षात जोडा मारून हेच थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही असं मत शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी व्यक्त केले. तसेच संबंधित प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक पोलीस ठाणे येथे तक्रारही दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ गुन्हा नोंद करून किरीट सोमय्या या अटक करावी अन्यतः शिवसेना पुन्हा उग्र आंदोलन छेडल असा इशारा पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख विष्णू साबळे, महानगर प्रमुख विष्णू साठे ,व्यापारी आघाडी सेना जिल्हा संघटक बसवराज मंगरुळे ,शिवसेना मार्गदर्शक सी. के. मुरळीकर ,तालुकाप्रमुख बाबुराव शेळके , विधानसभा प्रमुख एस. आर. चव्हाण , विधानसभा समन्वयक युवराज वंजारे , विधानसभा संघटक माधव कलमुकले , शहर प्रमुख सुनील बसपुरे , रमेश माळी , युवती सेना जिल्हा संघटिका श्रद्धा जवळगेकर , कामगार सेना महिला आघाडी  ,जिल्हा संघटिका प्रीतीताई कोळी , सुवर्णाताई वाघमारे , अल्पसंख्यांक सेना जिल्हा संघटक मुनीर खा पठाण , ऑटो रिक्षा चालक सेना त्रिंबक स्वामी , माजी उपजिल्हाप्रमुख शंकर रांजणकर , फेरीवाला व्यवसाय सेना हणमंत पडवळ , उपशहर प्रमुख शंकर गंगणे , सुधाकर कुलकर्णी  , मारुती सावंत , नरसिंग आईलवड , सोमनाथ स्वामी ,  राजू कतारे , राहुल आप्पा रोडे , शिवराज शिवराज मुळावकर , प्रदीप उपसे , अँड. नारायण कव्हेकर , चंद्रशेखर मेटे , आजम शेख , हिरालाल साबळे  ,  बाळू दंडीमे ,  रफिक नाना शेख , भास्कर माने , राजू  घटमल  , साधु मोरे  यांच्यासह सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *