• Sun. Jun 22nd, 2025

किरीट सोमय्या प्रकरणावर गृहमंत्री फडणवीसांचं सभागृहात उत्तर! म्हणाले, प्रकरण गंभीर…

Byjantaadmin

Jul 18, 2023

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे खळबळ माजली असून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात या प्रकरणी चौकशीची मागणी केली.ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी देखील हा विषय सभागृहात मांडला. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हा विषय अतिशय गंभीर आहे. राजकारणात असे अनेक प्रसंग येतात ज्यामुळे माणसाचे सर्व राजकीय आयुष्य पणाला लागतं. माझ्याकडे तक्रारी द्या मी चौकशी करतो. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होईल. ती महिला कोण आहे, हे जाहीर करणार नाही. मात्र कुणालाही पाठीशी घालणार नाही.आम्ही वरिष्ठ स्तरावर चौकशी करणार आहोत.ANIL PARAB  यांनी मांडलेला विषय गंभीर आहे. कोणतही प्रकरण दाबल्या जाणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून तपास केला जाईल”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. किरीट सोमय्या आणि भाजपा नेते या व्हिडिओमुळे अडचणीत आलेत. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात या कथित व्हि़डिओवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत.आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी या व्हिडिओ प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. तर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी थेट फडणवीसांना प्रश्न केला आहे.’किरीट सोमय्या यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा, असं देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं आहे. किरीट सोमय्या सातत्याने ईडी, सीबीआय चौकशीची मागणी करत होते. याच किरीट सोमय्यांच्या मागणीप्रमाणे तुम्ही त्यांची देखील चौकशी ईडी, सीबीआयकडे देणार का? असा माझाFADNVIS यांना प्रश्न आहे’, असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *