सध्या पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि सचिनची यांची लव्हस्टोरी संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, सीमा हैदर ही पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोप करण्यात येत आहेत. उत्तर प्रदेश एटीएसच्या पथकाने सीमा हैदरला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी सुरू केली. सीमा सुरुवातीपासूनच एटीएसच्या रडारवर होती. सीमा ही सचिनला भेटण्यासाठी तिच्या मुलांसह नेपाळमार्गे भारतात आली होती. व्हॉट्सअॅप चॅट आणि सर्व पुराव्याच्या आधारे एटीएसचे पथक सीमाची चौकशी करणार आहे.सीमाची ओळखपत्रे उच्चायुक्तांना पाठवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सीमाचे काका पाकिस्तानी लष्करात सुभेदार असून तिचा भाऊ पाकिस्तानी सैनिक आहे. भारताची सुरक्षा एजन्सी आता सीमाची चौकशी करणार आहे. एटीएस पथकाद्वारे सीमाच्या लव्हस्टोरीपासून तर भारतात येण्यापर्यंच्या सर्व बाबींवर चौकशी केली जात आहे.
उत्तर प्रदेशातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सीमा ही पाकिस्तानी नागरिक आहे आणि ती भारतात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा परिस्थितीत तिची चौकशी करणे आवश्यक आहे. देशाच्या सुरक्षेशी निगडित अशा सर्व यंत्रणा तिची चौकशी करतील.लॉकडाऊनच्या काळात २०१९ मध्ये सीमा आणि सचिन पबजी गेम खेळताना एकमेकांच्या संपर्कात आले. यानंतर त्यांच्यात ओळख झाली आणि ओळखीच रुपांतर प्रेमात झाले. दरम्यान, १३ मे २०१३ रोजी सीमा हैदर नेपाळमार्गे बसने भारतात आली. सचिन ग्रेटर नोएडाच्या रबुपुरा भागात राहायला आहे. सीमा देखील त्याच्यासोबत राहते. सचिन दुकान चालक आहे. व्हिसाशिवाय नेपाळमार्गे चार मुलांसह बेकादेशीरपणे भारतात प्रवेश केल्याप्रकरणी सीमाला पोलिसांनी ४ जुलै रोजी अटक केली. याचबरोबर एका अवैध निर्वासिताला आश्रय दिल्याच्या आरोपावरून सचिनची तुरुंगात रवानगी करण्यात आली. यानंतर दोघांची सुटका करण्यात आली. मात्र, उत्तर प्रदेश एटीएसने सीमाला चौकशीसाठी पुन्हा ताब्यात घेतले आहे.
सीमा हैदरला पाकिस्तानला परत पाठवा; बंद खोलीतील व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले!
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर’ची संपूर्ण देशभरात सध्या उलटसुलट चर्चा आहे. आपल्या प्रेमासाठी बेकायदेशीररित्या पाकिस्तानातून भारतात प्रवेश करत ती उत्तर प्रदेशातील आपल्या प्रियकराकडे पोहचली. मात्र, सीमा हैदर पाकिस्तानी गुप्तहेर बनून भारतात आल्याचा दावा केला जातोय. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील एटीएस पथक सतर्क झाले. उत्तर प्रदेशच्या एटीएसच्या नोएडा युनिटने सीमाला रबुपुरा गावातून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच तिला अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच सीमा हैदरचा बंद खोलीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सीमा हैदर बंद खोलीत डान्स करताना दिसत आहे. सीमाने लाल रंगाची साडी नेसलेली आहे आणि डोक्यावर पदर घेऊन स्वत:चा चेहरा झाकला आहे. तिच्यावर लावलेले आरोप इतके गंभीर असतानाही ती काही महिलांसोबत बंद खोलीत नाचत आहे. सीमा नाचत असताना काही महिलाच्या तिच्या डोक्यावरून पैसे फिरत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.सीमाचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काही जणांनी सीमाच्या डान्सचे कौतूक केले आहे. तर, काही जणांनी पाकिस्तान परत पाठवून द्या, अशी मागणी केली आहे. सीमा हैदर पाकिस्तानची गुप्तहेर असल्याचाही दावा केला जात आहे. एका नेटकऱ्याने सीमा हैदर पाकिस्तानी लष्करातील मेजर सामिया रहमान असल्याचे म्हटले आहे. सीमाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकरी कमेंट करत आहेत.