• Sun. Jun 22nd, 2025

“कारवाई करणार का?”; दानवेंनी थेट सभागृहात सादर केला ‘पेनड्राईव्ह’

Byjantaadmin

Jul 18, 2023

भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. किरीट सोमय्या आणि भाजप नेते या व्हिडिओमुळे अडचणीत आलेत. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात या कथित व्हि़डिओवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. दरम्यान या प्रकरणावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विधान परिषदेत बोलताना आक्रमक झाले आहेत. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले कि, ‘काही भाजप नेत्यांनी ईडी, सीबीआयची भीती दाखवून अनेक महिलांना ब्लॅकमेल केलं आहे. या नेत्याला सीआयएसएफची सुरक्षा आहे. या सुरक्षेचा वापर महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जातो. काही महिलांच्या मजबुरीचा फायदा घेतला जातो.’

‘माझ्याकडे सोमय्यांचे 8 तासांचे व्हिडिओ आहेत ते मी सभापतींकडे देणार आहे. असा हा भाजपचा नेता म्हणजे किरीट सोमय्या. माझ्याकडे या देशद्रोही नेत्यांच्या व्हिडिओचा पेनड्राईव्ह आहे. या नेत्याला सत्ताधारी संरक्षण देणार का? कि त्यांच्यावर कारवाई करणार’ असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे.तर माझे ईडीशी संबध आहेत असं सांगुन महिलांचे शोषण केलं जातं. तर अशा काही घटना माझ्यासमोर आल्या आहेत, असंही यावेळी बोलताना दानवे म्हणाले आहेत. तर या प्रकरणाचे माझ्याकडे काही व्हिडीओ आले आहेत असं म्हणत दानवेंनी ते व्हिडीओ असलेले पेन ड्राईव्ह उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे दिले आहे. तर या नेत्याला चांगल्या प्रकारची सुरक्षा आहे. ती काढुन त्यांच्यावर कारवाई करणार का? असं दावने म्हणालेत.या प्रकरणात नाव समोर आलेल्या किरीट सोमय्या यांना सत्ताधारी संरक्षण देणार का? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे. तर दानवे यांनी पेन ड्राईव्ह उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे दिले आहे. तर सोमय्या यांना केलेल्या चौकशीच्या मागणीवर विचार करत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, संरक्षण असणाऱ्या नेत्यावर सरकार कारवाई करावी, असं दानवेंनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *