• Sun. Jun 22nd, 2025

काँग्रेस पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाही; मल्लिकार्जुन खर्गेंचं मोठं विधान

Byjantaadmin

Jul 18, 2023

नवी दिल्ली : काँग्रेस पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाही, असं मोठं विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलं आहे. बंगळुरु इथं सुरु असलेल्या विरोधकांच्या बैठकीत त्यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळं देशाचं राजकारण आणखी वेगळं वळण घेण्याची शक्यता आहे.एएनआयच्या वृत्तानुसार विरोधकांच्या बैठकीत बोलातना खर्गे म्हणाले, “मी स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त चेन्नईत आयोजित कार्यक्रमात यापूर्वीच बोललो आहे की, काँग्रेस सत्ता मिळवण्यासाठी आणि पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाही. या बैठकीत आमची भावना ही स्वतःसाठी सत्ता मिळवणं अशी नाही. आमची भावना ही संविधानाचं संरक्षण करणं, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाचं संरक्षण करणं ही आहे”

https://twitter.com/ani_digital/status/1681221146069401601?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1681221146069401601%7Ctwgr%5E1bab83f5c8688ba5bf1d7bf4b5b296f6fee19509%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fdesh%2Fcongress-is-not-interested-in-power-or-pm-post-says-kharge-at-opposition-meeting-aau85

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *