• Mon. Jun 23rd, 2025

खातेवाटपात अजित पवारांची दादागिरी, आता पुण्याचे पालकमंत्री पदही मिळणार?

Byjantaadmin

Jul 15, 2023

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. पुरेसे संख्याबळ असताना देखील अजित पवार यांच्या गटाला सरकारमध्ये सहभागी करून घेण्याची काय गरज होती, असा सवाल करत शिवसेनेच्या गटातील नेत्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत होतेच. त्यात अजित पवार यांना अर्थखाते देऊ नये अशी गळ देखील शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घातली होती. मात्र शिवसेना आणि भाजपच्या काही नेत्यांचा विरोध असताना देखील अर्थमंत्री पद खेचून आणण्यात अजित पवारांना यश मिळाले आहे. इतकंच काय तर अर्थ खात्यासोबत कृषी, सहकार, महिला आणि बालविकास, अन्न व नागरी पुरवठा यांसारखे तगडी खाते मिळवत मंत्रिमंडळात अजितदादांची ‘दादागिरी’ दिसून आली आहे

Chandrakant Patil Ajit Pawar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *