• Tue. Apr 29th, 2025

७ नोव्हेंबर रोजी रेणा साखर कारखान्या चा 17 व्या गळीत हंगामाचा होणारं शुभारंभ

Byjantaadmin

Nov 5, 2022

७ नोव्हेंबर रोजी रेणा साखर कारखान्या चा 17 व्या गळीत हंगामाचा होणारं शुभारंभ

माजी मंत्री रेणा साखर कारखान्याचे संस्थापक दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार

लातूर :-दिलिप नगर निवाडा तालुका रेणापूर येथील रेणा सहकारी साखर कारखान्याच्या १७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवार दि.०७ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११.०५ वाजता माजी वैद्यकीय शिक्षण व सांसकृतीक कार्य मंत्री,महाराष्ट्र राज्य तथा माजी पालक मंत्री, आमदार .अमीत विलासरावजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे संस्थापक, माजी क्रिडा व युवक कल्याण मंत्री, मा.श्री.दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या शुभहस्ते लातूर जिल्हा मध्य.सह.बँकेचे चेअरमन मा.आ.श्री.धिरज विलासरावजी देशमुख साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्याम भोसले, ट्वेंटी वन शुगर चे उपाध्यक्ष विजय देशमुख, जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांची उपस्थिती राहणार आहे

कारखाना कार्यक्षेत्रामध्ये हंगाम सन २०२१-२२ व २०२२-२३ मध्ये पाऊस समाधानकारक झाल्यामुळे शेतकयांनी ऊस लागवडीवर भर दिला त्यामुळे कार्यक्षेत्रात मोठ्याप्रमाणावर ऊस लागवड झाली आहे व पाऊस चांगला झाल्यामुळे ऊसाची चांगली वाढ झालेली आहे. कार्यक्षेत्रातमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या संपुर्ण ऊसाचे वेळेवर गाळप होणेच्या दृष्टिकोणातून कारखान्याचे संस्थापक तथा माजी मंत्री.दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या नियोजनबध्द मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापणाने कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याचे काम हाती घेतले व ते काम अलपावधीतच पुर्ण करून कारखाना गाळपास सज्ज केला त्यामुळे कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे विना विलंब वेळेवर गाळप होईल. रेणा कारखान्याने चाचणी हंगामापासून गाळपास आलेल्या ऊसाला सातत्याने एफ.आर.पी.प्रमाणे किंबहुना त्यापेक्षाही जास्तीचा ऊस दर दिला असून पुढील हंगामातसुध्दा रेणा कारखान्याकडून गाळपास आलेल्या ऊसाला उच्चतम दर देण्याचा प्रयत्न राहील.

गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोड वहातुक ठेकेदार, कर्मचारी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे व आपला ऊस रेणा साखर कारखान्यास जास्तीत जास्त गाळपास देण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री.सर्जेराव मोरे, व्हा.चेअरमन श्री.अनंतराव देशमुख,कार्यकारी संचालक श्री.बी.व्ही.मोरे व सन्माननीय संचालक मंडळानी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed