लातूर जिल्हा बँक व साखर कारखानाच्या वतीने ऊसतोडणी यंत्र कलश पूजनाचा सोमवारी समारंभ
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार बाबासाहेब पाटील, अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत होणारं शानदार सोहळा
लातूर :-लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील साखर कारखान्याचे उस उत्पादक शेतकऱ्यांना एक नवं पुढें पाऊल टाकत हरवेस्टर देवुन रोजगार निर्मिती कडे वाटचाल देण्याचा प्रयत्न केला आहे एक आगळा वेगळा सोहळा लातूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क टाऊन हॉल येथे जिल्हा बँक व जिल्ह्यातील मांजरा साखर कारखाना, रेणा, जागृति, विलास साखर युनिट १ व २, ट्वेंटी वन शुगर, सिध्दी शुगर, मारुती महाराज न्यू हॉलंड, शक्तिमान, करतार हारवेस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता ऊसतोडणी यंत्राचे कलश पूजन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर, यांची उपस्थिती राहणार आहे
या भव्य दिव्य उस तोडणी कलश पूजन समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख व्हॉईस चेअरमन अँड प्रमोद जाधव, संचालक अँड श्रीपतराव काकडे संचालक पृथ्वीराज शिरसाठ संचालक व्यंकटराव बिरादार, एन आर पाटील, अशोक गोविंदपूरकर, राजकुमार पाटील, मारोती पांडे, जयेश माने, अनुप शेळके, सौ स्वयं प्रभा पाटील, सौ अनिता केंद्रे, श्रीमती लक्ष्मीबाई भोसले, सौ सपना किसवे, स्विकृत संचालक सुनिल कोचेटा, कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांनी केले आहे