• Tue. Apr 29th, 2025

आदर्श अकरा शेतकऱ्यांच्या हस्ते डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर लिज ओंकार साखर कारखान्याचा प्रथम गाळपाचा मुळी टाकून शुभारंभ

Byjantaadmin

Nov 5, 2022

आदर्श अकरा शेतकऱ्यांच्या हस्ते डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर लिज ओंकार साखर कारखान्याचा प्रथम गाळपाचा मुळी टाकून शुभारंभ

माजी मंञी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती

निलंगा/प्रतिनिधी

निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु.येथील डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर लिज सहकारी साखर कारखाना युनिट २ चे आदर्श अकरा शेतकऱ्यांच्या हस्ते प्रथम गाळपाचा शुभारंभ करण्यात आला असून या कार्यक्रमाला माजी मंञी संभाजीराव पाटील निलंगेकर व माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर,ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील,रेखाताई बोञे पाटील,उस्मानाबाद जनता बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांची प्रमुख उपस्थिती होती.तर यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष राहूल केंद्रे,जि.प.च्या माजी उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके,बापुराव राठोड,संजय दोरवे,शेषराव ममाळे,संभाजीराव पाटील शिरूरअनंतपाळकर अदी मान्यवर उपस्थित होते.

या अकरा शेतकऱ्यांच्या हस्ते झाला डॉ निलंगेकर कारखान्याचा मुळी टाकून शुभारंभ… सुग्रीव पाटील मधुकर सुर्यवंशी माकणीकर गोविंद पाटील रावसाहेब मुळे सुभाष घोडीबा म्हेत्रे मधुकर रामचंद्र चिद्रे नामदेव पाटील माधव शंकरराव अर्जुने जनार्दन शंकरराव बिरादार पांडुरंग निवृत्ती जाधव विजयकुमार नरसिंगराव लामदांडे

डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मेहनतीतून सदरील कारखाना उभा टाकला असून निलंगा मतदार संघातील शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी उभा केलेला आहे.१२ हजार सभासदांच्या मालिकीचा हा साखर कारखाना असून यात बिलकुल राजकारण आणणार नाही.केवळ शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवूनच हे युनीट व्यवस्थित चालवावे १२ महिने पूर्ण झालेला ऊस शेतकऱ्यांनी कारखान्याला द्यावा जेनेकरून कारखाना व्यवस्थित चालेल व आपल्या ऊसाला भावही मिळेल.डॉ.निलंगेकर साखर कारखाना समासद व शेतकऱ्यांचा होण्यासाठी आपण लाठ्या काठ्या झेलल्या आहेत.मोठ्या संघर्षातून हा कारखाना आपण ताब्यात घेतला आहे.राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस व माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली आपण मिळवला असून केवळ शेतकऱ्यांच्या विकासासाठी व शेतकरी मालकीचा हा साखर कारखाना असेल अशी ग्वाही यावेळी आमदार निलंगेकरानी दिली.यावेळी माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर व चेअरमन बोञे पाटील उस्मानाबाद बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांची भाषणे झाली या गळीत हंगाम शुभारंभाला लातूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed