• Tue. Jun 24th, 2025

लातूर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी मोईज शेख यांची निवड

Byjantaadmin

Jul 13, 2023

लातूर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी मोईज शेख यांची निवड

लातूर :-येथे लातूर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनची वार्षिक आढावा बैठक संपन्न झाली.या आढावा बैठकीमध्ये उपाध्यक्ष तथा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते क्रिडामहर्षी मोईज शेख यांची सर्वानुमते असोसिएशनच्या अध्यक्षपदी तर प्रदीप सोनवणे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. असोसिएशनचे सचिव पाटील यांनी त्यांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यावेळी सत्कार केला.
तसेच जिल्हा कार्यकारणी मध्ये नूतन सदस्य म्हणून श्री. संजय शेटे,श्री. प्रविण सूर्यवंशी,श्री. ता सौदागर,श्री.शाहरुख पटेल, सौ.डॉ.आम्रपाली देशमुख यांची निवड करण्यात आली.
बैठकीला असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ.आशाताई भिसे, कोषाध्यक्ष श्री,लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव देविदास पाटील, राजेश करंजीकर, विलास जाधव, कल्पना टप्पेकर प्रा.रत्नराणी कोळी, गंगाधर नलवडे,दिलीप दाढे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *